कळंबोली परिसरात शेतकरी कामगार पक्षाला हादरा

खिडुकपाडा रोडपालीतील शेकडो कार्यकर्ते भाजपात
पनवेल /प्रतिनिधी:- सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खिडुकपाडा रोडपालीतील शेकडो शेकाप  कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे कळंबोली परिसरात शेतकरी कामगार पक्षाला मोठा हादरा बसला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जातो.
खिडुकपाडा रोडपालीतील शेतकरी कामगार पक्षात  अनेक वर्षापासून हे कार्यकर्ते काम करीत होते. मात्र त्यांचे कित्येक  प्रश्न प्रलंबित राहिले. पायाभूत सुविधांचा वाणवा या गावांमध्ये असल्याने तेथे आमदार प्रशांत ठाकूर विकास करू शकतात असा विश्वास पटल्यानंतर दोन्ही गावातील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे कळंबोली शहर उपाध्यक्ष प्रशांत रणवरे यांच्या माध्यमातून कमळ हातात घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रविवारी खांदा वसाहतीत प्रभाकर उलवेकर, हरी उलवॆ कर, निवृत्ती उलवेकर, जनार्धन उलवेकर, विष्णू उलवेकर, सतीश उलवेकर, भाया उलवेकर, आदेश उलवेकर, अनिल उलवेकर, विजय उलवेकर, शाकुंत उलवेकर, यशवंत घरत, नरेश उलवे कर, सोमनाथ उलवेकर, सखाराम उलवेकर, मधुकर गोंधळी, आकाश उलवेकर, चांगदेव उलवेकर, रुपेश ठाकूर, सुरेश ठाकूर, राजेश ठाकूर, प्रवीण म्हात्रे, संतोष ठाकूर, विजय ठाकूर, विजय ठाकूर, रोशन उलवेकर, जगदीश उलवे कर, राजेश उलवे कर यांच्यासह इतर कार्यकर्त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वागत केले, यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, प्रभाग समिती सभापती संजय भोपी, नगरसेविका सीताताई पाटील, माजी स्थायी समिती सभापती अमर पाटील, नगरसेवक एकनाथ गायकवाड, अमर ठाकूर, शर्मा, राजू बनकर, डी. एन मिश्रा,सितु शर्मा, जमीर शेख, रवी पाटील दशरथ म्हात्रे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय जनता पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना पक्षात सन्मानाची वागणूक दिली जाईल. त्याचबरोबर  या दोन्ही गावातील सर्व प्रश्नांची सोडवणूक केली जाईल अशी आश्वासन आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिले. अरुणशेठ भगत यांनी सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करताना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली खिडुकपाडा,रोडपालीचा विकास केला जाणार असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.