कामोठेत दिराकडून माय – लेकाची हत्या

घरातून बाहेर काढल्याचा राग

पनवेल /प्रतिनिधी: -घराबाहेर काढल्याचा राग मनात ठेवून आपल्या भावाची पत्नी व त्यांच्या दोन वर्षाच्या मुलाचा खून केल्याची घटना कामोठे वसाहतीत सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेने रक्ताच्या नात्याला काळीमा फासला . त्याचबरोबर स्थानिक रहिवासी आणि नातेवाईक सुद्धा हादरले आहेत.
सुरेश दिनकर चव्हाण असे आरोपीचे नाव आहे. तो आपला लहान भाऊ योगेश दिनकर चव्हाण यांच्यासोबत कामोठे वसाहतीतील सेक्टर 34 येथील भूखंड क्रमांक 64 वरील एकदंत सोसायटीतील रुम नं . ३०४ राहत होता. परंतु फिर्यादीने आरोपीला घरातून बाहेर काढले होते. हा राग मनात धरुन , आपला भाऊ घरात नसल्याचा संधीचा फायदा घेऊन सोमवारी रात्री सुरेश घरी गेला. आणि त्याने आपली वहिनी जयश्री चव्हाण (22) हिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिला व दोन वर्षाच्या लहानग्या अविनाश ला ठार मारले. याबाबत कामोठे पोलीस ठाण्यात महिलेचा पती योगेश यांनी फिर्याद दिल्यानंतर त्याच्याविरोधात, हत्येचा गुन्हा मंगळवारी पहाटे चार वाजता नोंदवण्यात आला. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली. सदर गुन्हयाचा अधिक तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर भटे व पथक आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published.