जामखेडच्या स्त्रीशक्तीचा नवे शिखर गाठण्याचा संकल्प

महिला मेळाव्यात  महिला सक्षमीकरणावर मार्गदर्शन
जामखेड प्रतिनिधी: -अहमदनगरचे पालकमंत्री प्रा.राम शिंदे  यांच्या मार्गदर्शनाखाली  शुक्रवारी सिताराम गड खर्डा येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला सक्षमीकरण तसेच सबलीकरणावर मार्गदर्शन करण्यात आले. यानिमित्ताने जामखेड तालुक्यातील नारीशक्ती ने नवीन  शिखर गाठण्याचा संकल्प केला.
जामखेड पंचायत समितीच्या माजी सभापती आशाताई राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या मेळाव्याला अंबिका मसालेच्या कमलताई परदेशी यांनी उपस्थित महिलांना स्वयंरोजगार तसेच गृह उद्योगाविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील राणी येसुबाई फेम प्राजक्ता गायकवाड यांनी भगिनींना जिंकून घेतले. प्रमुख पाहुण्या धनश्रीताई सुजय विखे पाटील यांनी महिलांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी परिसरातील उद्यानाचे उदघाटन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले . पंचायत समिती चे सभापती भूषविलेल्या आशाताईंनी शिंदे यांनी महिलांशी संवाद साधला. त्यांनी तालुक्यातील माता-भगिनींना भेडसावणारे प्रश्न पालकमंत्र्यांच्या माध्यमातून मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमास प्रा.राम शिंदे यांच्या मातोश्री, विविध गावांच्या महिला सरपंच, महिला उपसरपंच व पंचक्रोशीतील महिलांची संख्या लक्षणीय होती.