प्रदूषण नियंत्रण महामंडळाची पूरक अनंत चतुर्थी

पनवेल मनपा हद्दीत 3000 कापडी पिशव्यांचे वाटप
विसर्जनाच्या ठिकाणी राबवला उपक्रम
पनवेल /प्रतिनिधी: – राज्यात प्लास्टिक पिशव्यांना बंदी आहे. त्या अनुषंगाने कायद्याचा आधार घेत अंमलबजावणी करण्यात येत आहेच. त्याचबरोबर जनसामान्यांमध्ये प्रबोधन आणि जनजागृती करण्याचे काम प्रदूषण नियंत्रण महामंडळाने हाती घेतली आहे. गुरुवारी अनंत चतुर्थीचे औचित्य साधून विसर्जनाच्या ठिकाणी महामंडळाच्या वतीने कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.
महाराष्ट्रात शासनाने प्लास्टिक बंदी आहे. त्यानुसार प्लास्टिक पिशव्यांचा वापर होऊ नये याकरिता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून कारवाई केली जात आहे. पनवेल महानगरपालिकेने प्लास्टिक निर्मुलना करिता राज्यात सर्वात अगोदर पाऊल टाकले. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी प्लास्टिक बंदीचा पनवेल पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात वापरला. नुसार विघटन होणाऱ्या तसेच पर्यावरणाला हानिकारक असलेल्या प्लास्टिक पासून प्रगत महाराष्ट्र मुक्त करण्यासाठी राज्य शासनाने ठोस पाऊल उचलले आहे. दरम्यान प्लास्टिक पिशव्या हा दैनंदिन जीवनाचा एक भाग बनला होता. त्यामुळे आजही काही ठिकाणी या पिशव्यांचा वापर केला जातो. संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याबरोबरच त्यांच्या मानसिकतेत बदल करण्याच्या दृष्टिकोनातून राज्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्था त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या वतीने जनजागृती केली जाते. त्याचाच एक भाग म्हणून पनवेल महापालिका क्षेत्रात गुरुवारी प्लास्टिकला पर्याय म्हणून कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. रोडपाली येथील तलावावर विसर्जनाच्या ठिकाणी कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश गायकवाड, नगरसेवक सतीश पाटील, भाजपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष कदम, मनपाचे आरोग्य निरीक्षक दौलत शिंदे, प्रभाग अधिकारी हरिश्चंद्र कडू, स्वच्छता निरीक्षक मनोज चव्हाण, अभियंता राहुल जाधव यांच्या सह विविध मंडळांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे फिल्ड मग यातील ख ऑफिसरअभिजीत लोहाई यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळण्याचे गणेश भक्तांना आवाहन केले. याशिवाय खारघर, कामोठे आणि इतर ठिकाणीही कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.