महानगर गॅसकडून महापालिकेला व्टिन बिन्स

दोनशे ठिकाणी नवीन बिन्स बसवणार

पनवेल/प्रतिनिधी-महानगर गॅस कंपनीकडून पनवेल महापालिकेला सीएसआर फंडातून दोशने व्टिन बिन्स देण्यात आले आहेत. गुरूवारी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत हे बिन्स मनपाकडे सपुर्द करण्यात आले. आवश्यक त्या ठिकाणी ते बसविण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

महापालिकेत समाविष्ट असलेल्या भागात या आगोदर सीएसआर फंडातून बिन्स बसविण्यात आले आहेत. आता आनखी  दोनशे बिन्स गर्दीच्या ठिकाणी  लावण्यात येणार आहेत.

बिस्किट, रॅपलससह कागद तसेच इतर कचरा रस्त्यावर न टाकता तो बिन्समध्ये टाकणे आपेक्षीत आहे. खारघर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला महापौर डाॅ कविता चौतमोल, स्थायी समिती सभापती प्रविण पाटील, प्रभाग समिती सभापती क्षत्रुघ्न  काकडे, महिला व बालकल्याण सभापती लिना गरड,  माजी सभापती अभिमन्यु पाटील, नगरसेविका नेत्रा किरण पाटील, आरती नवघरे, महापालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर, सहाय्यक आयुक्त शाम पोशेट्टी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.