साई प्रतिष्ठानने जपली सामाजिक बांधिलकी

विसर्जन यंत्रणांना पाणी व अल्पोपहार वाटप

पनवेल/प्रतिनिधी- अध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रात आग्रभागी असलेल्या कळंबोली येथील साई प्रतिष्ठानच्या वतीने गणेश विर्सजनाच्या वेळी सामाजिक बांधिलकी जपली. गुरूवारी रोडपाली तलवाच्या ठिकाणी बंदोबस्तावर असलेले पोलीस तसेच यंत्रणा तसेच स्वयंसेवकांना  चहा-बिस्कीट पाणी आणि अल्पोपहार   वाटप करण्यात आला.

गुरूवारी अनंत चतुर्थीच्या दिवशी 11 दिवसांच्या बाप्पांना जड अंतरणाने निरोप देण्यात आला. कळंबोली परिसरात गणरायांचे रोडपाली तलावात विर्सजन करण्यात आले होते. यावेळी वरिष्ठ पोलीस निरिक्षक सतीश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.महापालिका, सिडको, अग्निशमन दलही त्या ठिकाणी होते.   सेवेकरी न्हावकरी, जिवरक्षक, सुरक्षा रक्षक,  स्वयंसेवक रात्री उशीरापर्यंत विसर्जन घाटावर असतात. त्या दरम्यान त्यांना तहान, भुक लागते परंतु विसर्जनाच्या काळात गणेशभक्तांची गैरसोय होवू नये म्हणून त्यांना तिथेत थांबावे लागते. ही गोष्ट लक्षात घेवून जनसेवक नितीन काळे यांनी साई प्रतिष्ठानचे पदाधिकारी तसेच सदस्यांबरोबर घेवून  पाणी, चहा  तसेच अल्पोपहाराची सोय केली.