कामोठे वसाहतीत खड्ड्यांचे श्राद्ध

एकताचे अनोखे आंदोलन
पनवेल /प्रतिनिधी-: कामोठे वसाहतीतील रस्ते खड्ड्यात गेले आहेत. याबाबत सिडकोकडून कोणत्याही उपाययोजना होताना दिसत नाहीत. त्यामुळे कामठेकर त्रस्त झाले आहेत. म्हणून एकदा सामाजिक सेवा संस्थेने खड्ड्यांच्या साद घालून अनोखे आंदोलन केले. या निमित्ताने तरी सिडको जागी होईल असा विश्वास संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.
इतर वसाहतींत प्रमाणेच कामोठे येथील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. पावसाच्या अगोदर रस्ते खड्डे मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून सिडकोकडून कोणतेही प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे वसाहतीतील रस्ते खड्ड्यात की खड्डे रस्त्यात असा सवाल उपस्थित केला जात आहे. अनेक ठिकाणी वाहने चालवणे जिकिरीचे बनले आहे. दुचाकी खड्ड्यात पडून अपघातही होत आहेत. त्यामुळे चारचाकी वाहनांमध्ये बिघाड होत आहे. खड्ड्यांमुळे पाठीचे कणे आणि मानेचे स्नायू दुखावले जात आहेत. एकीकडे सिडको स्मार्ट सिटी ची भाषा करीत असताना दुसरीकडे वसाहतीतील रस्ते खड्ड्यात गेले आहेत. दरम्यान याबाबत एकता सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने सिडकोकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. परंतु प्राधिकरणाकडून याबाबत उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. परिणामी परिस्थिती बिकट झाले आहे. या निषेधार्थ संस्थेच्या वतीने सिडकोचे लक्षवेध देण्याकरिता रविवारी खड्ड्यांचे श्राद्ध घालण्यात आले. यावेळी अमोल शितोळे, संतोष चिखलकर, अल्पेश माने, सुभाष सावंत,गौरव जहागिरदार, सुशांत सुवरे, सुनील कर्पे, उषा डुकरे- घुले उपस्थित होते.