अजयकुमार लांडगे पनवेलचे ठाणेदार

कामोठेची  जबाबदारी बाळासाहेब तुपे यांच्या कडे
नवी मुंबई सात पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
पनवेल /प्रतिनिधी:- विनोद चव्हाण यांना सहाय्यक पोलिस आयुक्त पदी बढती मिळाल्यानंतर रिक्त असलेल्या पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी अखेर अजयकुमार लांडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर विशेष शाखेचे काशिनाथ गणपत चव्‍हाण यांची बदली करण्यात आली आहे. तर कामोठा पोलीस ठाण्याची जबाबदारी बाळासाहेब तुपे यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
पनवेल शहर पोलीस ठाण्यात प्रशासन पोलीस निरीक्षक म्हणून शत्रुघ्न माळी जबाबदारी सांभाळतील. ते या अगोदर आरबीआय सुरक्षा शाखेत कर्तव्यावर होते. कामोठे पोलीस ठाण्यातील मधुकर वामन भटे यांची काही दिवसातच नवीन पनवेल वाहतूक शाखेत प्रभारी अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नियंत्रण कक्षाच्या विमल बिडवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सीबीडी वाहतूक शाखेची जबाबदारी सायबर सेलचे भाऊसाहेब गायकर यांना देण्यात आली आहे. दरम्यान अतिशय महत्त्वाच्या समजणाऱ्या पनवेल शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार कोण येणार याबाबत उत्सुकता लागली होती. याठिकाणी कार्यतत्पर आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून पोलीस दलात नावलौकिक असलेले अजयकुमार लांडगे यांच्या नावाची चर्चा होती. त्यानुसार पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी लांडगे यांच्यावरपनवेल शहर पोलीस ठाण्याची जबाबदारी सोपवली आहे.