निलेश लंके ही म्हणणार ये लावा रे व्हिडीओ..

भाळवणी च्या सभेत विरोधकांना दिले आव्हान
कार्यकर्ता मेळाव्यात केले आक्रमक भाषण
पारनेर /प्रतिनिधी: – येथील लोकप्रतिनिधी म्हणतात की निलेश लंके भिकाऱ्या सारखा फिरत आहे. अरे मी भिकारी नसून फकीर आहे. तुमच्यासारखा ठेकेदारांना फोनवर दम देऊन वसुल्या करीत नाही असा गंभीर आरोप करून वेळ आल्यावर सगळ्या क्लिप दाखवणार आणि वाजवणार ही असे आव्हान पारनेर नगरचे राष्ट्रवादी उमेदवार निलेश लंके यांनी विरोधकांना दिले. रविवारी भाळवणी ते पार पडलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी यांच्या उपस्थित पार पडलेल्या मेळाव्याला पक्षाचे नेते पदाधिकारी उपस्थित होते.
निलेश लंके यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार विधानसभेचे उपाध्यक्ष विजयराव औटी यांच्यावर टीकास्त्र सोडले.माझ्या कुटुंबाकडे लक्ष देण्या पेक्षा येथील लोकप्रतिनिधी ने स्वतः चा चिरंजीव सांभाळावा अशी बोचरी टीका केली. ते फक्त स्वतः आणि स्वतःच्या कुटुंबा पुरते मर्यादित आहेत. पारनेर नगर जनता हे माझं कुटुंब आहे, असे सांगतात टाळ्यांचा कडकडाट झाला. दिवंगत आमदार कॉम्रेड बाळासाहेब ठुबे यांच्यानंतर पारनेर मध्ये एकही तलाव खोदला गेला नाही. स्वतःला कार्यसम्राट म्हणवणाऱ्या लोकप्रतिनिधीने येथील पाण्याच्या समस्येबाबत एकही प्रश्न विचारला नाही. तालुक्यातील कारखाना कवडीमोल भावाने विकला गेला. त्याबाबत स्थानिक आमदाराने काही केले नसल्याचा आरोप निलेश लंके यांनी केला. वेळ आल्यानंतर मीही सगळे प्रकरण बाहेर काढणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. काही दिवसापूर्वी एका गावात दहा लोकांना स्वान दंश झाला. परंतु त्यांना देण्याकरता एकाही प्राथमिक आरोग्य केंद्रात लस मिळाली नाही. हे कशाचे प्रतीक आहे असा सवाल लंके यांनी उपस्थित केला.

ज्यांच्या रक्तात शिवसेना आहे ते माझ्या बरोबर असून. ज्यांना जय भवानी जय शिवाजी म्हणण्याची लाज वाटत होती त्यांनी आम्हाला निष्ठा काय असते ते शिकवू नये असा टोलाही लगावला.
एक सर्व सामान्य मास्तर च पोरग राजकारणात आल आहे. हे तालुक्यातील प्रस्तापित मंडळींच्या डोळ्यात खुपत आहे. त्यामुळे हे सगळे एक झाले आहेत. पण माझ्यासोबत माय बाप जनता आहे. त्यामुळे मी कोणत्याही प्रस्थापितांना घाबरत नसल्याचेही निलेश लंके यांनी सांगितले.
तुमच्या भावाला , मुलाला या मित्राला फक्त एकदा मदत करा. तुमच्या पाठीशी नव्हे तर तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची धमक ह्या निलेश लकें मद्ये आहे. अस म्हणत त्यांनी उपस्थितांना भावनिक साद ही घातली.