महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले

 

21ऑक्टोबर रोजी होणार मतदान
24 तारखेला मतमोजणी
दिल्ली प्रतिनिधी: – महाराष्ट्राच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे.24 ऑक्टोबर रोजी राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात मतदान घेतले जाणार आहे. तर 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी केली जाणार आहे. निवडणूक आयोगाने शनिवारी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.
राज्यात गेल्या काही महिन्यापासून वारे वाहू लागले आहेत. नेमके मतदान कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यानुसार आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. चार ऑक्टोबर रोजी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.5व 7 ऑक्टोबरला अनुक्रमे अर्जाची छाननी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे.