सोडा ‘धनुष्य’ पहा निलेश लंके ‘मनुष्य’

मुंबईस्थित पारनेर नगरकरांची हाक
ठाणे येथे स्नेह मेळाव्याला उस्फूर्त प्रतिसाद
ठाणे/ प्रतिनिधी: – या आगोदर  तीन वेळा आपण शिवसेनेचा आमदार केला. परंतु मतदारसंघातील  अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. ते सोडवण्याकरीता आपल्या हक्काचा माणूस विधानसभेत हवा आहे. त्यासाठी 21 ऑक्टोबरला होऊ घातलेल्या निवडणुकीत ‘सोडा धनुष्य पहा निलेश लंके मनुष्य’ अशी हाक मुंबईस्थित पारनेर नगरकरांनी रविवारी ठाणे येथे पार पडलेल्या स्नेह मेळाव्यात दिली.
पारनेर अवर्षणग्रस्त तालुका आहे. त्यामुळे पाण्याचा गंभीर प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. कोरडवाहू शेती  ती लहरी स्वरूपाच्या मान्सूनवर अवलंबून आहे. त्यामुळे अनेकजण नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबई, ठाणे, बोईसर, कल्याण, अंबरनाथ, नवी मुंबई आणि पनवेल येथे स्थायिक झाले. दरम्यान यापैकी अनेकांचे मतदान हे आपल्या मूळ गावी आहेत. काहीजण सरपंच उपसरपंच तसेच पंचायत समितीचे सदस्य सुद्धा आहेत. एकंदरीतच तालुक्याच्या राजकारणावर मुंबईस्थित पारनेर करांचा मोठा प्रभाव आहे. त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांपासून लोकसभेच्या निवडणुका जिंकता येत नाही. विधानसभा निवडणुकीत सुद्धा मुंबईकरांची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरते. दरम्यान मुंबईस्थित पारनेरकरांवर निलेश लंके यांचा प्रभाव आहे. यापैकी अनेक जण शिवसेनेला मानणारे आहेत. परंतु यावेळी कोणत्याही परिस्थितीत निलेश लंके यांना आमदार करायचे म्हणजे करायचेच असा जणु काही पणच मुंबईतील पारनेरकर यांनी केल्याचे दिसून आले. रविवारी ठाणे येथील पोखरण रोडवरील  कृष्णाई हॉल मध्ये स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुंबईकरांनी मोठी गर्दी केली होती. आपल्यापैकी काहीजण जरी शिवसैनिक असले तरी या निवडणुकीत धनुष्य विसरून निलेश लंके हा  मनुष्य पाहूयात असा एकासुरात संकल्प करण्यात आला.21 ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये असलेले पारनेर नगर विधानसभा मतदारसंघातील शंभर टक्के मतदान कसे होईल याची जबाबदारी स्वयंस्फूर्तीने उपस्थितांनी घेतली. आम्ही मुंबईकर तन-मन-धनाने निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरू असा विश्वास  निलेश लंके यांना मुंबईस्थित पारनेर नगरकरांनी दिला.
चला गावाकडे…..
निलेश लंके यांना निवडून आणण्याकरता मुंबईतील मतदान 21 ऑक्टोबर रोजी तालुक्यात नेले जाणार आहेच. त्याचबरोबर आपल्या गावात तसेच सोयरे – धायरे, मित्रपरिवार यांच्या गाठीभेटी घेऊन प्रचार करण्यासाठी चला गावाकडे असणारा देण्यात आला.