पुतण्याचे पाणीदार आश्वासन.. काकांच्या पत्राने पडले  कोरडे

 

 

अजित पवारांकडून  सदाशिव लोखंडेना दिलेले उत्तर व्हायरल

जामखेडकरीता कुकडीच्या पाण्याचे नियोजन  आघाडीनेच न केल्याचे  उघड

जामखेड/प्रतिनिधी- कर्जत- जामखेड तालुक्याला पाणी आणण्याकरीता भाजपने काहीच प्रयत्न केले नाही. आपण अगामी काळात हक्काचे पाणी आणणारच असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार रोहित पवार यांनी दिले आहे. तत्कालीन आमदार सदाशिवराव  लोखंडे यांनी कुकडीचे पाणी जामखेडला मिळण्याकरीता तत्कालीन पाटबंधारे मंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. परंतु कुकडीच्या पाण्याच्या वापराचे नियोजन पूर्ण झाल्याने आपली मागणी अमान्य करण्यात येत असल्याचे उत्तर पवार यांनी दिली होते. हे  पत्र भाजपने व्हायरल करून  काकांच्या पत्राने पुतण्याच्या पाणीदार आश्वासन एक प्रकारे कोरडे करण्याचा प्रयत्न केला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत आणि जामखेड हे दोनही तालुका उपेक्षित राहिलेले आहेत.येथे सातत्याने दुष्काळजन्य परिस्थिती आहे. जलसिंचनासाठी आघाडीच्या काळात  राज्यकर्त्यांनी फारशे लक्ष्य न दिल्याने या भागात पाणी येवू शकले नाही.याचे सर्वात मोठे कारण असे की केंद्रात व राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता असताना कर्जत-जामखेड मतदारसंघात सातत्याने भारतीय जनता पक्षाचा आमदार निवडूण येत असे. त्यामुळे या भागाकडे फारशे लक्ष्य दिले गेले नसल्याचा आरोप होत आहे. कर्जतच्या काही गावांना कुकडीचे पाणी मिळत असले तरी बहुतांशी गाव जलसिंचनाच्या प्रतिक्षेत आहेत. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी तुकाई चारीचा प्रश्न मार्गी लावल्याने आनखी काही गावांचे क्षेत्र पाण्याखाली येणार आहे. परंतु जामखेड तालुक्याची शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. या तालुक्यात कुकडीचे पाणी आणण्याच्या दृष्टीकोनातून पालकमंत्र्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्या अनुषंगाने पाठपुरावाही त्यांनी केला आहे. दरम्यान या तालुक्यात पाणी का आणले नाही असा सवाल करून  त्यांना हक्काचे पाणी समन्यायी पध्दतीने मिळवून देणार असे आश्वासन रोहित पवार यांच्याकडून दिले जात आहे. ते करीत असतानाही त्यांच्याकडून भाजप सरकार आणि पालकमंत्र्यावर टिका केली जात आहे. दरम्यान भाजपने 2001 साली अजित पवार पाटबंधारे मंत्री असताना या मतदारसंघातील तत्कालीन आमदार सदाशिवराव लोखंडे यांनी दिलेल्या लेखी उत्तराचे पत्र व्हायरल केले आहे. जामखेड तालुक्याला कुकडीचे पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी लोखंडे यांनी केली होती. मात्र कुकडीच्या पाण्याच्या वाटपाचे नियोजन पूर्ण झालेले आहे. त्यामुळे आपली मागणी मान्य करणे शक्य होणार असे उत्तर त्यांनी दिले आहे. दरम्यान आघाडी शासनाच्या काळात या दोनही तालुक्याला पाणी देण्याच्या संदर्भात कोणतेच प्रयत्न झाले नसल्याचे भाजपच्या स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे. तत्कालीन पाटबंधारे मंत्र्यांनी पहिले येथून पक्षाचा  आमदार निवडूण दया मग पाणी देवू असे उत्तर दिले असल्याचेही त्याचे म्हणणे आहे. रोहित पवार यांनी मागचा इतिहास पहावा असा सल्लाही भाजपचे स्थानिक नेते तथा पणन संचालक पाडुरंग उबाळे यांनी दिला आहे.