मग गोळया बिस्किट,साडया वाटून विकास होईल काय !

 

 

 

रोहित पवारांच्या रस्ते बनवून विकास होतो का या प्रश्नावर नेटकरींचे उत्तर
प्रा.राम शिंदे यांच्यावरील टीका झाली ट्रोल

जामखेड/प्रतिनिधी:-रस्ते बनवले म्हणजे विकास होत नाही असा टोला रोहित पवार यांनी प्रा.राम शिंदे यांना मारला होता.माञ नेटकरींकडून या विषयांवर पवारांवर  सडकून टिका करण्यात आली आहे.गोळया,बिस्किट व साडया वाटून  विकास होईल का  या प्रतिसवाल करीत पवार यांचा प्रश्न ट्रोल करण्यात आले आहे.

पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य शरद पवारांचे नातु रोहित पवार हे अहमदनगरच्या कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात आपले नशिब आजमावत आहेत.या ठिकाणाहून पालकमंञी प्रा.राम शिंदे दहा वर्ष निवडूण येत आहेत.हा भाजपचा परंपारिक मतदारसंघ मानला जातो.दरम्यान कमळाच्या या गडावर घडयाळाची टिकटिक सुरू आहे.रोहित पवार यांनी गेल्या काही महिन्यापासून तयारी सुरू केली आहे.वेगवेगळया सभा व कार्यक्रमातून ते पालकमंञ्यावर टिका करीत आहेत.रस्ते बनवून विकास होतो का असा सवाल त्यांनी केला.सोशल मिडीयात रोहित पवार यांच्या या भाषणावर कमालीची टिका झाली.रस्ते विकासाच्या धमण्या आहेत.गोळया बिस्किट,साडया वाटप तसेच सहली काढून विकास होतो का असा सवाल पवार यांना करण्यात आला आहे.विकास म्हणजे लवासा का,सिंचनातील घोटाळा का धरणात…..असा
टोला सोशल मिडीयात लगावला आहे.60 वर्ष तुमची सत्ता होती आपल्या आजोबा व काकांनी काय केले असा प्रतीसवाल करण्यात आला आहे.रस्तेच विकासाचा मार्ग आहे.इतके तुम्ही मान्य केली की प्रा.रा शिंदे यांनी रस्त्यांचे जाळे निर्माण केले आहेत हे तुम्ही मान्य केले हे बर असा टोलाही सोशल मिडीयावर लगावला आहे. दहा एकर क्षेञात शंभर कोटी रूपयांचे उत्पन्न तसेच सात पिढयांची कमाई हा विकास आहे का असाही टिका सुध्दा करण्यात आली आहे.