आघाडीच्या पंधरा वर्षा इतके अवर्तनं  युतीने पाच वर्षात सोडले

कर्जत-जामखेडला महायुतीच सरकारच पाणी देणार
भारतीय जनता पक्षाचा आश्वासक दावा
जामखेड/ प्रतिनिधी: – कर्जत-जामखेडला पाच वर्षात पंधरा वर्षे इतके कुकडीचे आवर्तन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या प्रयत्नातून सोडण्यात आले. त्यामुळे भविष्यात या दोनही तालुक्याला महायुतीच पाणी देणार असल्याचा आश्वासक दावा भाजपा पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या प्रचार जास्त पाऊस पडला नसला तरी ओला होईल अशी चिन्ह दिसू लागले आहेत.
कर्जत जामखेड मतदार संघ सातत्याने दुर्लक्षित राहिला. अहमदनगर जिल्ह्याच्या इतर तालुक्यांच्या तुलनेत या दोन तालुक्यात जलसिंचनना करिता राज्यकर्त्यांनी फारसे प्रयत्न केले नाहीत. दरम्यान कुकडीच्या पाण्याचे नियोजन करीत असताना आघाडी सरकारने  कर्जत-जामखेडला विचारात घेतले नसल्याचे तत्कालीन पाटबंधारे मंत्री अजित पवार यांनी त्यावेळचे आमदार सदाशिवराव लोखंडे यांना दिलेल्या उत्तरात स्पष्ट झाले आहे. दरम्यान कुकडीचे पाणी कर्जत आणि जामखेड परिसरातील काही भागांना मिळत आहे. त्यामुळे काहीप्रमाणात जलसिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवता येतो. परंतु असे असताना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी शासनाच्या काळात पंधरा वर्षात  या दोन्ही तालुक्यात साठी फक्त 39 इतक्या वेळाच आवर्तन सोडण्यात आले. पारनेर श्रीगोंद्याच्या तुलनेत कर्जत आणि जामखेडला अतिशय कमी पाणी दीड दशकामध्ये मिळाले. दरम्यान मध्यंतरी आघाडी शासन असताना स्थानिक आमदार म्हणून प्रा .राम शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठे आंदोलन केले होते. कमालीची दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने   या परिसरात पिण्याच्या पाण्याचा यक्ष प्रश्न उभा राहिला होता. टंचाईवर मात्रा म्हणून कर्जत आणि जामखेडला कुकडीचे आवर्तन सोडावे यासाठी प्रा .शिंदे यांनी आपल्या अंगावर रॉकेल ओतून घेतले होते. यामुळे संबंधित यंत्रणा आणि शासन खडबडून जागे झाले आणि या भागासाठी आवर्तन सोडण्यात आले. दरम्यान लोकवर्गणीतून सर्व डागडुजी करण्यात आली. प्रा. शिंदे यांच्या प्रयत्नामुळे सर्व अडथळ्यांच्या शर्यती पार करीत चोंडी पर्यंत पाणी आणण्यात आले. दरम्यान काँग्रेस-राष्ट्रवादी च्या काळात आम्हाला पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. तेव्हा कुठे कुकडीचे काही आवर्तने सोडण्यात आली असल्याचे जामखेड तालुका पणन संचालक पांडुरंग उबाळे यांनी सांगितले. गेल्या पाच वर्षांचा विचार करीत असताना पालकमंत्र्यांनी कर्जत आणि जामखेडला कुकडीचे पाणी मिळावे या दृष्टिकोनातून सातत्याने प्रयत्न केले. त्यामुळे पाच वर्षात बत्तीस आवर्तनं युती शासनाच्या काळात सोडण्यात आले. जे पंधरा वर्षात आघाडी शासनाने केले ते पाच वर्षात पालकमंत्री प्रा .राम शिंदे आणि करून दाखवले अशी प्रतिक्रिया भाजपचे तालुकाध्यक्ष रवी सुरवसे यांनी दिली. त्यांनी तुकाई चारीचा प्रश्न मार्गी लावला. त्याचबरोबर दोन्ही तालुके जलसिंचन खाली आणण्याच्या दृष्टीकोनातून ठोस पावले भाजप सरकारने उचलली आहेत. आगामी काही वर्षात या भागाला मुबलक पाणी मिळणार म्हणजे मिळणारच त्यासाठी प्रा राम शिंदे यांच्या पाठीमागे कर्जत-जामखेड करांनी ठामपणे उभे राहावे असे आवाहन भाजपचे तालुका सरचिटणीस लहु शिंदे यांनी केले आहे.