कर्जत मध्ये लोटला जनसागर

प्रा. राम शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
मोठया जनसमुदाय द्वारे केले शक्तिप्रदर्शन
कर्जत/ प्रतिनिधी:- अहमदनगर चे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानिमित्ताने कर्जत मध्ये मोठा जनसागर लोटला. या माध्यमातून भारतीय जनता पक्षाने शक्तिप्रदर्शन करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पर्यायाने रोहित पवार यांना आव्हान दिले.
तत्पूर्वी सकाळी चोंडी येथे निवासस्थानी आई-वडिलांचा आशिर्वाद घेऊन व त्यानंतर अहिल्यादेवी स्मारक व मंदिरात जाऊन प्रा. राम शिंदे यांनी दर्शन घेऊले. तसेच कर्जत येथे अर्ज दाखल केला. यावेळी राशीन रोड ते दादा पाटील महाविद्यालय यादरम्यान भव्यदिव्य स्वरुपाची रॅली काढण्यात आली होती. यामध्ये कर्जत आणि जामखेडकर यांनी मोठी गर्दी केली.
यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी खासदार दिलीप गांधी, माजी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार मोनिकताई राजळे, आमदार शिवाजीराव कर्डीले, कर्जत चे प्रथम नगराध्यक्ष मा.श्री.नामदेव(देवा) राऊत तसेच कर्जत-जामखेड तालुक्यातील भाजप-शिवसेना महायुतीचे सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह मोठा जनसमुदाय उपस्थित होता. रॅलीचे रूपांतर प्रचार सभेत. यावेळी उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टिकास्त्र सोडले

भिमाचे पाणी सिनेत आणणार
प्रा. राम शिंदे यांनी जोरदार फटकेबाजी करीत गेल्या दहा वर्षात कर्जत आणि जामखेड परिसरात केलेल्या कामांचा आढावा घेतला. येथील प्राणी प्रश्न मार्गी लावण्याकरता भीमा नदीचे पाणी सीना नदीत आणणार असल्याचे प्रा. शिंदे यांनी सांगितले. त्याचबरोबर या मतदारसंघातील हक्काचे पाणी मिळावे याकरिता कायदा करण्याकरीता पाठपुरावा करणार असल्याचे ते म्हणाले.

 

Coming Soon
कोरोना रोखण्यासाठी कोणते उपाय आहेत ?
कोरोना रोखण्यासाठी कोणते उपाय आहेत ?
कोरोना रोखण्यासाठी कोणते उपाय आहेत ?