यांचे नातू मात्र कुठे ही उभे राहू शकतात !

 

 

सुजय विखे यांचा पवारांना टोला
कर्जतच्या सभेत राष्ट्रवादीवर हल्लाबोल
कर्जत/ प्रतिनिधी:- महाराष्ट्रातील इतर कुटुंबांना आचारसहिता आणि यांचे नातू कुठे उभे राहु शकतात. अशा शब्दात खासदार डॉ .सुजय विखे यांनी शरद  पवारांना टोला लगावला. शुक्रवारी कर्जत येथे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या भव्य दिव्य सभेत विखे यांनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल चढवला.
दादा पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या मेळाव्यात डॉ .विखे यांनी चौफेर फटकेबाजी करीत पवार कुटुंबीयांवर टिकास्त्र सोडले. लोकसभेच्या निवडणुकीत हे ‘बाहेरचा नको घरचा पाहिजे’ असे बोर्ड विरोधकांनी लावले होते. हिम्मत असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कर्जत- जामखेड मध्ये असे बोर्ड लावावेत असे आव्हान खासदारांनी दिले. या जिल्ह्याने स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांच्यावर नितांत प्रेम केले आहे. मी कधीच म्हटलं नव्हतं माझे लाड तुम्ही पुरवा. ते पुरवायला या जिल्ह्यातील जनता समर्थ आहे मला कोणा पुढार्‍याची गरज नाही असे सुजय विखे यांनी सांगितले. जर राज्यात पुन्हा  महायुतीची सत्ता येणार असेल. पुन्हा देवेंद्र फडणीस मुख्यमंत्री होणार असतील तर पालकमंत्री हे प्रा. राम शिंदे झाले पाहिजेत त्यासाठी कर्जत-जामखेड करांची साथ हवी आहे असे आवाहन त्यांनी केले. राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणतात मी तुम्हाला पाणी देतो. गेल्या 60 वर्षात यांची सत्ता असताना या दोन्ही तालुक्यांना पाणी दिले नाही. आता ते पाणी देणार कुठून असा सवाल रोहित पवार यांचे नाव न घेता डॉ. विखे यांनी केला. कुकडीचे पाणी येडगाव धरणातून येते. त्याठिकाणी शिवसेनेचा आमदार निवडून येणार आहेत. ज्या ठिकाणाहून पाणी येते त्या पारनेर आणि श्रीगोंदयात अनुक्रमे शिवसेना आणि भाजप चे आमदार असतील. मग कर्जत जामखेडला भाजपचे आमदार पाहिजेच असे मत त्यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तरुण पिढीला अंधाराच्या खाईत लोटले असल्याचा आरोप डॉ सुजय विखे यांनी केला. पालकमंत्री म्हणून प्रा. राम शिंदे यांनी अनेक विकास कामे केली आहेत. भविष्यातही या परिसराचा विकास करण्यासाठी त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या असे आवाहन विखे यांनी केले.

पालक मंत्री आमच्या पेक्षाही जास्त मतांनी निवडून येतील
राहुरी चे आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी आपल्या घणाघाती भाषणात प्रा. राम शिंदे यांच्या कामाचे कौतुक केले. आजची गर्दी पाहून पालकमंत्री आमच्या मतदारसंघ पेक्षाही जास्त मताधिक्क्याने निवडून येतील असा विश्वास कर्डिले यांनी व्यक्त केला. फक्त शिंदे साहेबांनी आमच्याकडेही लक्ष द्यावा असे म्हणतात टाळ्यांचा कडकडाट होऊन एकच हशा पिकला.