तळोजा एमआयडीसी रोडवर कमान कोसळली

 

दोन कामगार किरकोळ जखमी असल्याचे वृत्त
पनवेल प्रतिनिधी: – तळोजा एमआयडीसी च्या मुख्य रस्त्यावर कमानीच्या नव्याने उभारण्यात येत असलेली कमान खाली कोसळली. त्यामध्ये दोन कामगार जखमी झाले असल्याचे समजते. रविवारी सायंकाळी सात वाजता ही घटना घडली.
नावडा ब्रिज खाली उतरल्यानंतर काही मीटर अंतरावर एमआयडीसीचा मुख्य रस्त्यावर कमान बांधण्याचे काम सुरू होते. वरती स्लॅब असताना बांधत असताना कमानीचा काही भाग खाली पडला. सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाही. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस तसेच एमआयडीसी आणि महापालिकेचे यंत्रणा घटनास्थळी पोहोचली. खाली पडलेला कमानीचा भाग बाजूला काढण्याचे काम सुरु होते. दरम्यान यामुळे वाहतूक संथ झाली होती. तळोजा वाहतूक पोलिसांनी ती सुरळीत केली.