एक किलो झेंडू@ 120 रूपये 

पावसाचा फटका बसल्याने भाव कडाडला

पनवेल/प्रतिनिधी

दसरा-दिवाळीला झेंडूच्या फुलांना सर्वाधिक मागणी असते. या पार्श्‍वभूमीवर फुलशेती करणारे शेतकरी जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणावर झेंडूचे उत्पादन घेतात; मात्र यंदा जास्त पाऊस पडल्याने   उत्पादनात घट होऊन बाजारात झेंडूचा पुरवठा उपलब्ध मागणीच्या तुलनेत कमी पडला आहे. परिणामी झेंडूचा बाजार तेजीत आला आहे. पनवेलमध्ये एक किलो झेंडूकरीता 120 रूपये ग्राहकांना मोजावे लागले आहे. दसऱ्याच्या दिवशी म्हणजे मंगळवारी  भाव वाढ होण्याची शक्यता आहे.
ऐन झेंडूच्या वाढीच्या हंगामात पाऊस  झाला त्याचाफुलांच्या गुणवत्तेवर, तसेच उत्पादनावरही परिणाम झाला. बाजारात दाखल होणारा झेंडू काही प्रमाणात भिजलेले   दिसून आले . काही शेतकर्‍यांनी दिवाळी डोळ्यासमोर ठेवून झेंडूची विलंबाने लागवड केली.  यावेळेस झेंडूचे जे मळे फुलले होते त्या फुलांवर परतीच्या पावसारूपी मोठे संकट कोसळले. काही ठिकाणी पाऊस न झाल्याने फुले कोमजलेली आहेत.
मंगळवारी  विजयादशमी अर्थात दसर्‍याचा सण साजरा केला जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर  पुणे  दादर, कल्याण या ठिकाणच्या फुलबाजारामध्ये यंदा फुल कमी आली. त्याचबरोबर पनवेल व कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत दरवर्षापेक्षा यंदा आवक फारच कमी असल्याने व्यापारी व विक्रेत्यांनी जास्त पैसे मोजावे लागले. साहजिकच रविवार व सोमवारी  ग्राहकांना सुध्दा 120 ते 140 रूपये प्रति किलोने झेंडूची फुले विकण्यात आली. कळंबोली, कामोठयात दरवर्षी पुणे जिल्ह्यातून थेट शेतकरी फुले विक्रीकरीता येतात. त्यांनी सुध्दा आज 120 रूपये किलोने फुलांची विक्री केली. यंदा पावसाने नुकसान केल्याने  फुलांना अधिक भाव असून पिक सुध्दा कमी असल्याचे शेतकरी सांगतात असे खांदा वसाहतीतल होलसेल फुलविक्रेते दिनेश सदानंद पाटील यांनी सांगितले.शेवंती तीनेशे रूपये

पनवेल, कळंबोलीच्या बाजारपेठेत   शेवंतीची फुल तर अतिशय तुरळक दिसले. प्रतिकिलो तीनशे रूपये किलो दराने ही फुले सोमवारी  कळंबोलीत विकली गेली.