कर्जत -जामखेड मध्ये एम .एच 16 विरुद्ध 12

प्रचारात स्थानिक आणि बाहेरचा मुद्दा ठरतोय प्रभावी
स्थानिकांच्या वजनाने  प्रा. राम शिंदे यांचे पारडे जड
जामखेड /प्रतिनिधी: – कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघांमध्ये ऑक्टोबर हीट प्रमाणेच राजकीय वातावरणही तापले आहे. एम एच 16वर एम एच12 व 43चे अतिक्रमण का ?हा मुद्दा घेऊन भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते प्रभावीपणे प्रचार करीत आहेत. एकंदरीतच स्थानिक आणि बाहेरचा उमेदवार हा विषय प्रचाराच्या केंद्रभागी दिसून येत आहे. पालकमंत्री प्रा .राम शिंदे यांच्याकरीता अनेक गोष्टी प्लस आहेतच. त्याचबरोबर स्थानिक असल्याने त्यांचे पारडे जड आहे.
एका सालगडयाचा मुलगा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून प्रभावीपणे काम करतोय. त्याचबरोबर त्यांच्या रूपानेदुर्लक्षित असलेल्या कर्जत आणि जामखेडच्या  मंत्रिमंडळ समाविष्ट करून घेण्यात आले ही दोन्ही तालुक्यात करीता भूषणावह बाब असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर सर्वांशी मिळून मिसळून वागणारे, अडीअडचणीत मदतीकरीता धावून जाणारे नेतृत्व म्हणजे पालकमंत्री होय. गरीबी काय असते याची जाण असणारा नेता म्हणजेच प्रा. राम शिंदे होय त्यामुळे कर्जत आणि जामखेड मध्ये त्यांची अतिशय उत्तम आणि चांगली प्रतिमा असल्याचे गणेश हरिदास उबाळे या युवकाने सांगितले. सत्ता, लाल दिवा तसेच मंत्रिपदाची डोक्यात हवा न जाऊन देता सातत्याने पाय जमिनीवर ठेवणारे नेतृत्व म्हणजेच पालकमंत्री महोदय होय. त्यांच्यामुळे कर्जत जामखेड मधील विकासाचा अनुशेष बऱ्यापैकी भरून निघाला अशी प्रतिक्रिया अमृत तरंगे या युवकाडून उस्फूर्तपणे मिळली. दरम्यान गेली दोन टर्म या मतदारसंघातून प्रा.शिंदे निवडून जात आहेत. यावेळी शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे पुतणे पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारी देण्यात आली आहे. वास्तविक पाहता पक्षाला या ठिकाणी उमेदवार मिळाला नाही. म्हणून थेट पुणे जिल्ह्यातून अहमदनगर जिल्ह्यातील या मतदारसंघात उमेदवार आयात करण्यात आली असल्याची टीका भाजपाचे पदाधिकारी पांडुरंग उबाळे यांनी केली. वास्तविक पाहता बारामती व कर्जत -जामखेड चा जिल्हा वेगवेगळा आहे. तसेच हा मतदारसंघ नाशिक महसूल विभागामध्ये येतो. त्यामुळे जिल्ह्याबाहेर चा उमेदवार आम्हाला कसा चालेल असे मत संतोष साळुंके या तरुणाने नोंदवले. एकंदरीतच रोहित पवार यांनी गेल्या काही महिन्यांपासून या मतदारसंघात तयारी सुरू केली. त्यांचा काही महिन्यांचाच संबंध आहे. परंतु भाजप उमेदवार प्रा. राम शिंदे यांची जन्म आणि कर्मभूमी कर्जत जामखेड आहे. त्यांची या मातीशी नाळ जुळलेली आहे. पालकमंत्री म्हणून पूर्ण जिल्ह्याचा कारभार त्यांच्या हाती आहे .याचा कर्जत-जामखेड कर म्हणून आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे संजय भोंडवे सांगता. एकंदरीतच रोहित पवार यांनी काही कार्यक्रम आयोजित करून तसेच सहली चे नियोजन करून  वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला. परंतु मतदार संघ आणि जिल्ह्याबाहेरील उमेदवार म्हणून पवार यांना ही निवडणूक आव्हानात्मक असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.
जामखेड कर्जत च्या विकासाकरीता एम एच 16 च हवे
दरम्यान अहमदनगर जिल्ह्याचे वाहनांचे पासिंग एम एच -16 ने होते. तर पुणे जिल्ह्याला एम एच 12 हा सिरीयल नंबर आहे. रोहित पवार यांचा प्रचार करीता तसेच सभांसाठी मोठ्या प्रमाणात एम एच12 व 43 पासिंग असणारे वाहने कर्जत-जामखेड परिसरात येतात. त्यामुळे राष्ट्रवादीवाले पुणे येथून वाहने आणि माणस आणून शक्तिप्रदर्शन करतात. परंतु एम एच 16 ही आमची ओळख आहे. त्याचाच पुरस्कार करायचा तसेच एम एच 12 व 43  अहमदनगर मधून हद्दपार करा असे आवाहन कर्जत ते प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्यासह अनेक वक्त्यांनी शनिवारी भव्यदिव्य सभेत केले. त्यावरून एम एच सोळा , बारा  ञेचाळीस हा चर्चेचा विषय ठरला असून प्रचाराचा हा मुद्दा बनला आहे.