खटाराच्या विरोधात शेतकरी ट्रॅक्टर चालवणार

 

शेकापच्या हरेश केणी विरोधी अपक्ष हरेश केणी

नाना करंजुले

पनवेल/प्रतिनिधी नावात काय आहे असं नेहमी म्हटलं जातंपण निवडणुकीच्या रिंगणात नावाला बरंच महत्त्व असतं. एक सारखं नाव आणि आडनावाची उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरली तर बलाढ्य उमेदवाराला त्याचा फटका बसल्याचे अनेक उदाहरणे आहेत . पनवेल विधानसभा मतदारसंघातही शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार हरेश मनोहर केणी यांच्या विरोधात हरेश सुरेश केणी हे अपक्ष उमेदवार निवडणुकीत रिंगणात आहेत. विशेष म्हणजे शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराला खटारा चिन्ह मिळाले आहे. तर अपक्ष केणी यांनी  टॅक्टर चालवणारा शेतकरी हे चिन्ह मिळाले आहे.

20014 साली  लोकसभा निवडणुकीत  खासदार श्रीरंग बारणे, लक्ष्मण जगताप, सुनिल तटकरे यांच्या सारखे नाव असलेले डमी उमेदवार उभे करण्यात आले होतो.  अपक्ष असलेल्या सुनिल तटकरे या उमेदवाराने निर्णयाक मतदान घेतले होते. त्याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यावेळचे उमेदवार सुनिल तटकरे यांना बसला होता. त्याचबरोबर मागील वेळीस विधानसभेला प्रशांत ठाकूर, बाळाराम पाटील यांच्यासमोर डमी उमेदवार  देवून मतविभाजन करण्याची खेळी करण्यात आली होती. दोन वर्षापुर्वी पार पडलेल्या  पनवेल महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग-17मध्ये संदीप पाटील यांच्या विरोधात त्यांच्या नावात साम्य असलेला एक उमेदवार रासपकडून उभा करण्यात आला होता.अनेकदा मतविभाजनाकरीता विरोधी पक्षाकडून ही खेळी केली जाते. किंवा कित्येकदा प्रमुख उमेदवारप्रमाणे नाव असल्यास ती व्यक्ती अर्ज दाखल करते. पनवेल विधानसभा मतदारसंघात शुक्रवारी हरेश सुरेश केणी या व्यक्तीने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखला केला. शेतकरी कामगार पक्षाचे हरेश मनोहर केणी यांच्या नावाशी साम्य आहे. मागील काही निवडणुका शेकाप कपबशी या निवडणुक चिन्हावर लढले होते. मात्र पक्षाला निवडणुक आयोगाकडून यावेळी पुर्वीचे खटारा हे चिन्ह दिले आहे. त्यामुळे हरेश मनोहर केणी आपला खटारा पनवेल विधानसभा मतदारसंघात पळवणार आहेत. मिश्र लोकवस्ती हा खटारा घरोघरी पोहचविण्याचे मोठे आव्हान शेकाप उमेदवारासमोर आहे. त्यातच आनखी एक अपक्ष उमेदवार उभा राहिला आहे. आणि त्यांना ट्रॅकटवर बसलेला शेतकऱ्याचे चिन्ह सोमवारी देण्यात आले आहे.

कांतीलाल कडू यांना शिट्टी

काँग्रेसचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष तथा  पत्रकार कांतीलाल हरिश्चंद्र कडू हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. निवडणुक विभागाकडून कडु यांना  शिट्टी हे निवडणुक चिन्ह देण्यात आले आहे.