बबनदादा करणार प्रशांतदादांचाच प्रचार

 

 

 

 

शेवटच्या दिवशी घेतला उमेदवारी अर्ज मागे

पनवेल/प्रतिनिधी  पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे जिल्हा सल्लगार बबनदादा पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पक्षाकडून एबी फार्म न मिळाल्याने त्यांचा अर्ज बाद झाला होता. मात्र अपक्ष नामनिर्देशन पत्र वैध ठरले होते. उरणमध्ये महेश बालदी यांची बंडखोरी थंड व्हावी याकरीता शिवसेनेने पनवेलमध्ये दबाव टाकण्यासाठी ही खेळी केली होती. मात्र सोमवारी दुपारी पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत आमदार प्रशांत ठाकूर यांचाच प्रचार करण्याचे संकेत दिले.

पनवेल विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाची ताकत आहे. पनवेल महापालिका निवडणुकीत पक्षाने एक सत्ता प्रस्तापित केली आहे. या निवडणुकीत शिवसेना वेगळी लढली होती. परंतु एक नगरसेवक निवडूण आला नाही. या शिवाय लोकसभा निवडणुकीत पनवेलमधून श्रीरंग बारणे यांना 54 हजारांचे मताधिक्य मिळाले होते. यापाठीमागे भाजपचा पर्यायाने आमदार प्रशांत ठाकूर यांना मोठा वाटा होता. महेश बालदी यांनी उरण विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज भरून शिवसेनेचे आमदार मनोहर भोईर यांना आव्हान दिले आहे. उरणमध्ये भाजप युतीचा धर्म पाळत नसल्याचे सांगत पनवेलमध्येही बबनदादा पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. दरम्यान शनिवारी महेश बालदी यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करीत आपला उमेदवारी दाखल केला.त्यावरून ते माघार घेणार नाहीत हे स्पष्ट झाले होते. मात्र पाटील यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज पनवेल विधानसभा मतदारसंघातून मागे घेतला. पक्षाच्या आदेशानुसार आपण हा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीत युतीचा धर्म पाळणार असल्याचे बबनदादा पाटील यांनी सांगितले.

 

दहा उमेदवार रिंगणात

 

नाव                       चिन्ह      

1)प्रशांत राम ठाकूर        – कमळ

  २) फुलचंद मंगल किटके  – हत्ती 

  ३) प्रवीण सुभाष पाटील – खाट 

  ४) मानवेंद्र यल्लाप्पा वैदू – जातं 

  ५) राजीव कुमार सिन्हा  – पेनाची निंब सात किरणांसह 

  ६) हरेश मनोहर केणी – खटारा 

  ७) अरूण राम म्हात्रे – कप आणि बशी 

  ८) कांतीलाल हरिश्चंद्र कडू – शिट्टी 

  ९) संजय गणपत चौधरी – चावी 

  १०) हरेश सुरेश केणी – ट्रॅक्टर चालविणारा शेतकरी

या उमेदवारांनी घेतली माघार

  १) गणेश चंद्रकांत कडू

  २) अरुण विठ्ठल कुंभार

  ३) बबन कमळू पाटील