निलेश लंके गरीब असले तरी प्रामाणिक व सेवाभावी आहेत

 

 

शरद पवार यांचे गौरवोद्गार
पारनेर येथील प्रचार सभेला उस्फूर्त प्रतिसाद
ऑनलाईन बातमी न्यूज नेटवर्क
पारनेर प्रतिनिधी: – काहीजण सकाळ दुपार संध्याकाळ या पक्षातून त्या पक्षात प्रवेश करतात. गेले तर बरं झाले त्यांना बाजूला केल्यामुळे जनतेच्या प्रश्नांबाबत तळमळ असलेल्या कार्यकर्त्यांना संधी देता येते. याच भावनेतून आम्ही निलेश लंके यांना पारनेर नगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. लंके हे गरीब असले तरी प्रामाणिक व सेवाभावी आहेत. अशा कार्यकर्त्याला महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थितांना केले.
पारनेर येथील बाजार तळावर निलेश लंके यांच्या प्रचाराचा नारळ शरद पवार यांच्याहस्ते फोडण्यात आला. या वेळी पवार बोलत होते. पारनेर दुष्काळी तालुका आहे. त्यामुळे येथील अनेक जण मुंबई, पुणे औरंगाबाद याठिकाणी व्यवसायानिमित्त स्थायिक झाले आहेत. उद्योग धंद्याच्या ठिकाणी कष्टकरी आणि परिश्रम घेणारा पारनेरकर भेटतोच. अशा या मेहनती लोकांच्या मूळ गावातील प्रश्न सोडवणे अतिशय गरजेचे आहे. निलेश लंके यांनी पारनेरला शाश्वत पाणी देण्याच्या दृष्टिकोनातून पुढाकार घेतला आहे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निश्चित बळ देईल अशी काही पवार यांनी दिली. मी राज्य सहकारी बँकेचा न सदस्य होतोना संचालक ना कर्ज घेतले. तरीसुद्धा ईडीने वर गुन्हा दाखल केला. का तर संचालक मंडळ माझ्या ओळखीचे आहे म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे कारण मला देण्यात आलं. उद्या तुमच्या कोणी ओळखीचा असेल तर हे सरकार तुम्हालाही तुरुंगात बसल्याशिवाय राहणार नाही असा टोला शरद पवार यांनी लगावला. शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम भाजप सरकारने केले. त्याचबरोबर उद्योगधंदे ही संकटात सापडले आहेत. त्यालाही हे सरकार जबाबदार असल्याचेही पवार म्हणाले.यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, माजी खासदार दादा पाटील शेळके, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, दादाभाऊ कळमकर, उदय शेळके, माधव लामखडे, मधुकर उचाळे, सबाजी गायकवाड, प्रशांत गायकवाड, दीपक पवार, विक्रम कळकमकर उपस्थित होते.

निलेश लंके जनतेचे उमेदवार
उमेदवाराला जनतेकडून पैसे दिले जातात महाराष्ट्रातील दुर्मिळ गोष्ट
उमेदवाराला जनताच निवडणूक लढवण्यासाठी पैसे देते एक-दोन उदाहरणे वगळता ही गोष्ट महाराष्ट्रासाठी दुर्मिळच आहे. त्यामुळे निलेश लंके आघाडीची तर आहेच त्याचबरोबर जनतेचे उमेदवार असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. यावरून सर्वसामान्य व्यक्तीच्या पाठीमागे जनता नक्कीच उभी राहते हे स्पष्ट होते. तसेच पारनेर करांनी निलेश यांना या पद्धतीला पाठिंबा दिला तो संपूर्ण महाराष्ट्राला आदर्शवत ठरणार असल्याचेही शरद पवार म्हणाले.

शेळके, झावरे व पवारांचे स्मरण
पारनेर या ठिकाणी मी अनेकदा सभा घेतल्या त्यावेळी माझ्यासोबत गुलाबराव शेळके, वसंतराव झावरे आणि पोपटराव पवार असायचे. यांनी सातत्याने मला व पारनेरच्या जनतेला साथ दिली. ते आज आपल्यात नाहीत त्यांचे स्मरण होत असल्याचे शरद पवार यांनी सभेच्या सुरुवातीला सांगितले.