विजया दशमीच्या मुर्हतावर पनवेलमध्ये   वाजली शिट्टी

कांतीलाल कडू यांच्या प्रचाराचा वाढविला  नारळ!  
पनवेल/ प्रतिनिधी:- 
पनवेल विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार कांतीलाल कडू यांच्या प्रचाराचा नारळ दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. भक्तीकुमार दवे यांच्या हस्ते वाढविला. विशेष म्हणजे शिवसेनेचे महानगरप्रमुख संघटक,  युवा नेते अँड. प्रथमेश सोमण आणि महिला आघाडीचे नेत्या सीमा  मानकामे प्रचारात सहभागी झाले
कडू यांचा सामाजिक कार्यातून  जनसंपर्क वाढला आहे., अनेक आंदोलनातून  प्रशासनावर दबाव टाकीत  प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. काही सामाजिक संस्थांनी  बदल हवा, पनवेलच्या विकासासाठी कांतीलाल कडू यांचा चेहरा नवा, अशी घोषणाबाजीही  करीत आहे. 
 सकाळी दुर्गामातेच्या मंदिरात कांतीलाल कडू यांनी दसऱ्याच्यानिमित्ताने दर्शन घेतले आणि त्यानंतर कडू यांच्या कार्यलयात डॉ. दवे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. 
यावेळी कडू समर्थकांनी  जयघोष केला. शिट्टी वाजवून आता सीमोल्लंघन करण्याची वेळ झाली, मतदारांना जागृत करून विकास साधण्याची वेळ आली अशा घोषणाही त्यांनी दिल्या.