कांतीलाल कडू यांचा  भेटीगाठीवर भर

 

 

कांतीलाल कडू यांचा  भेटीगाठीवर भर

पनवेल/प्रतिनिधी –पनवेल विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार कांतीलाल कडू यांनी गाठीभेटीवर भर दिला आहे. त्यांनी बुधवारी नवीन पनवेल परिसरातील मान्यवरांच्या भेटी घेवून येथील समस्यांबाबत चर्चा केली. तसेच पनवेलच्या विकासाकरीता विधानसभेत पाठवा असे आवाहन त्यांनी केले.

भाजपा आणि शेकाप विरोधात कांतीलाल क़डू  निवडणुकीत उतरले आहेत.  त्यांनी आपली निशाणी असलेल्या शिट्टीच्या  प्रचारावर  भर दिला आहे. परिवर्तन हवे तर शिट्टीसमोरील बटण दावायला हवे, असे आवाहन कांतीलाल कडू यांच्यासाठी ज्येष्ठ कॉंग्रेस नेते डॉ. भक्तीकुमार दवे यांनी केले आहे.
कडू यांनी आज नवीन पनवेलमधील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी घेतल्या. त्यामध्ये प्रामुख्याने माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, सुनील मोहोड, सिडको कामगार संघटनेचे माजी अध्यक्ष भारतशेठ पाटील, सुकापूरचे माजी सरपंच दत्ता भगत, भगवानशेठ भगत, वसंत पाटील, माजी उपनगराध्यक्ष सुभाष भुजबळ आदींचा समावेश आहे.
यावेळी आनंद पाटील, अजय म्हात्रे, सचिन पाटील, स्वप्निल म्हात्रे, संतोष सुतार, धनंजय घाटे, गौरव भगत, भावेश पाटील, अजय सिंग, ओमकार जाधव, चेतन भोपी, मिलन पाटील, आकाश शेळके, ओमकार लाड, भूषण लाड, जयेश दुर्गे, विवेक लाड, स्वप्निल घाटे, रोहन घाटे यांच्यासह मोठ्या संख्येने कडू समर्थक उपस्थित होते.