नरेंद्र मोंदी यांची खारघरमध्ये सभा

16 आँक्टोबर रोजी तोफ धडाडणार

पनवेल/प्रतिनिधी- विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात नऊ सभा घेणार आहेत. त्यापैकी एक आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासाठी 16 आँक्टोबर रोजी पनवेलध्ये पार पडणार आहे. खारघर येथे या सभेचे नियोजन करण्यास सुरूवात झाली आहे. नवी मुंबई विमानतळाच्या भूमीपूजनानंतर पंतप्रधान आता  दुसऱ्यांदा पनवेल तालुक्यात येत आहेत.

मोठया इनकमिंगनंतर राज्यात पुन्हा एकदा युतीची सत्ता आणण्याच्या दृष्टीकोनातून भारतीय जनता पक्ष कामाला लागला आहे. सर्व मतदारसंघात निवडणुकीचा रंग भरण्यास सुरूवात झाली आहे.भाजपकडून केंद्रीय नेते प्रचारात उतरणार आहेत. त्यामध्ये अमित शहा, जेपी नड्डा तसेच नितीन गडकरी यांचा समावेश आहे. त्याचबरोबर पंतप्रधान सुध्दा राज्यात सभा घेणार आहेत. त्यामध्ये पनवेलचाही समावेश आहे.  पुढच्या बुधवारी 16 आँगस्ट रोजी खारघर सेक्टर 21 मधील सेंट्रल पार्कच्या बाजुला जागा निश्चित करण्यात आल्याचे समजते.2009 साली पनवेल येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आ. ठाकूर यांच्याकरीता सभा घेतली होती. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारासाठी  खारघरमध्ये येणार आहेत.