विजयराव कर्तृत्वाने विजय घेवून पुढे आलेल नेतृत्व

 

 

उध्दव ठाकरे यांच्याकडून औटी यांचे कौतुक

पारनेर/प्रतिनिधी- पंधरा वर्षापुर्वी पारनेरमध्ये आपला पराभव व्हायचा व्हायचा. मात्र विजयराव आल्यानंतर हा मतदारसंघ क्रमांक एकचा बालेकिल्ला झाला. त्यांच्या नावात विजय असला तरी ते खऱ्या अर्थाने विजय घेवून पुढे आलेले नेतृत्व आहे. अशा शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष विजयराव औटी यांचे कौतुक केले. बुधवारी त्यांच्या प्रचारार्थ पारनेर बाजारतळावर  ठाकरे यांनी सभा घेतली त्यावेळी ते बोलत होते.

खासदार सुजय विखे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेला संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर, काशिनाथ दाते, विश्वनाथ कोरडे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. सहयाद्रीच्या घाटावर पडणाऱ्या पावासाचे पाणी पारनेर नगरला वळवून या परिसराचे दुष्काळ निवारण केले जाईल. पारनेरची पाणीपुरवठा योजना राबविण्याबरोबरच साकळाई उपासा योजनाही अस्तित्वात येईल अशी ग्वाही पक्षप्रमुखांनी दिली. काँग्रेस राष्ट्रवादीचे दहा पेक्षा जास्त आमदार निवडूण येणार नाहीत. आणि आले तरी ते त्यांच्यात राहतील की नाही असा टोला त्यांनी लगावला. मी सत्तेत सहभागी झाले असलो तरी तुमचा आवाज आहे. आणि विजयराव औटी यांच्याकरीता आर्शिवाय मागायला आलो असल्याचे त्यांनी सांगितले.या आगोदर आपण बाळासाहेब विखे आणि राधाकृष्ण विखे यांचे भाषण ऐकले होते. आज सुजयचे पहिल्यांदाच विचार ऐकतो त्याचे खरोखर कौतुक वाटते असेही उध्दव ठाकरे म्हणाले.

तुम्ही जरा  प्रेमाने घेत चला…..

विजयराव औटीसाहेब आपण सर्वांना गोळा केले. त्यामुळे चिंता करू नका विजय तुमचाच आहे. तुम्ही जरा प्रेमाने घेत चला असा खासदार सुजय विखे यांनी सांगताच एकच हस्या पिकला. आपण दोघे मिळून काम करू पण प्रेमाने गोडबोलून तुम्हाला डायबेटीस असला तरी गोडबला असा सल्ला खासदारांनी दिला. सुजय यांनी सांगितल्याप्रमाणे  ते कडक स्वभावाचे आहेत पण ते प्रामाणिक आहेत. तो गोडबोलुन पाठीत वार करणाऱ्यापैकी नाहीत एक सच्चा माणुस असल्याचे सांगत ठाकरे यांनी औटी यांची पाठराखण केली.