रामभाऊ थोपवलेल नाही तर घडलेल नेतृत्व 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार
प्रा. राम शिंदे यांच्या प्रचाराचा सिद्धटेक येथे नारळ वाढवला
कर्जत/ प्रतिनिधी:- सामान्य घरातील एक मुलगा शिकला, प्राध्यापक झाला आमदार होऊन उभ्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये नाव कमावलं. रामभाऊ हे खऱ्या अर्थाने जनसामान्यांनी दिलेला नेता आहे. असे असताना याठिकाणी एखादं नेतृत्व थोपवलं जात असेल तर ते कर्जत-जामखेड कर कधीच स्वीकारणार नाहीत. येथील जनता प्रा. राम शिंदे यांच्यासारख्या घडलेल्या नेतृत्वा पाठीमागे ठामपणे उभी राहील असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिद्धटेक येथे व्यक्त केला.
शुक्रवारी प्रा. राम शिंदे यांच्या प्रचाराचा नारळ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाढवण्यात आला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या सभेला खासदार  सुजय विखे, आमदार सुरेश धस, माजी मंत्री बबनराव पाचपुते, कर्जत ते प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी आपल्या आवेशपूर्ण भाषणात शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. या निवडणुकीत काहीच मजा राहिली नाही. कारण पाच वर्षाचे पोरला विचार तरी ते सांगतय शिवसेना-भाजप आणि मित्र पक्षाची सत्ता येणार. त्यामुळे राहुल गांधी बँकॉकला निघून गेले. आणि शरद पवार यांची आधे उधर जाओ आधे इधर जाओ बचे हुए मेरे पीछे आयो अशी स्थिती झाली असल्याचा टोला त्यांनी लगावला. मी लंबे चौडे भाषण करण्याकरीता याठिकाणी आलेलो  नाही. फक्त इतकच विचारायला आलो आहे की लोकसभा निवडणुकीत मावळच्या जनतेने हिम्मत आणि ताकद दाखवून पार्थ पापूला जसे घरी पाठवले. तुमच्यामध्ये ती हिंमत आणि ताकद आहे का येथे आलेले पार्सल   रोहित पापूला परत पाठवायचे? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी करताच होय असा एक मुखी आवाज उपस्थितांनी मधून आला. तर मग येत्या 24 तारखेला होऊन जाऊ द्या फैसला मावळ मधील नागरिक मोठे कर्जत जामखेड मधील असे म्हणतात प्रा.राम शिंदे आगे बढो हम तुम्हारे साथ है! अशा प्रकारच्या घोषणा देऊन उपस्थितांनी मुख्यमंत्र्यांचे एक प्रकारे आव्हान स्वीकारले. 
आमचे रामभाऊ मोठा कलाकार माणूस आहे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी प्राध्यापक राम शिंदे यांच्या कामाचे  कौतुक करीत विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. आमचे रामभाऊ मोठा कलाकार माणूस आहे. भल्याभल्यांना ते पुरून उरले आहेत. समोर किती मोठा पैलवान आला तरी त्यालाच चितपट केल्याशिवाय ते गप्प बसत नाहीत. कारण ते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या तालमीत वाढलेले पैलवान आहे असे मुख्यमंत्री उदगारताच टाळ्या आणि शिट्या वाजवून कर्जत-जामखेड करांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.