कान्हुर पठारच्या बाजारात राष्ट्रवादीचा प्रचार

ग्राहक आणि विक्रेत्यांशी साधला संवाद
जि. प .सदस्या राणीताई लंके यांनी केले आवाहन
पारनेर/ प्रतिनिधी: पारनेर नगर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून वेगवेगळ्या मार्गाने मतदारांशी   थेट संवाद साधला जात आहे. बुधवारी कान्हुर पठार येथील बाजारात घड्याळाचा प्रचार करण्यात आला. जिल्हा परिषद सदस्य राणीताई लंके यांनी निलेश लंके यांनाच प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले. या ठिकाणी आलेल्या ग्राहक आणि विक्रेत्यांशी त्यांनी संवाद साधला.
21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून 19  तारखेला प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात प्रचार शिगेला पोहोचला आहे. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गावोगावी प्रचाराला सुरुवात केली आहे. बुधवारी कान्हुर पठार येथील आठवडे बाजारा निमित्त आलेल्या ग्राहक आणि विक्रेत्यांशी राणीताई लंके यांनी संवाद साधला. दरम्यान दर बुधवारी भरविण्यात येणाऱ्या या बाजारात आजूबाजूच्या गावातील लोक खरेदी-विक्री करता येतात. तसेच कान्हुर पठार गावची लोकसंख्याही सात ते आठ हजार आहे. मतदारांची संख्याही चार हजारांच्या घरात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गावात रॅली काढली. त्याला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. यानिमित्ताने परिचय पत्रकांचे वाटप करण्यात आले. यावेळी आम्ही निलेश लंके यांनाच आमदार करणार अशा उस्फूर्त प्रतिक्रिया अनेकांनी नोंदवल्या. प्रचारात पंचायत समितीचे माजी सदस्य राजूशेठ चौधरी, पंचायत समिती सदस्य सुनंदा सुरेश धुरपते, निलेश लंके  प्रतिष्ठानचे नवी मुंबई संपर्कप्रमुख भाऊ पावडे, किरण ठुबे, सचिन ठुबे, दीपक ज्ञानदेव लंके यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.