गुरूंच्या मदतीला धावले शिष्य

 

 

गणेश नाईकांच्या प्रचारात दीपक निकम

नवी मुंबई /प्रतिनिधी- माजी मंत्री गणेश नाईक ऐरोली विधानसभा मतदारसंघात निवडणुक लढवीत आहेत. महायुतीकडून निवडणुक रिंगणात असल्याने ते   मोठया फरकाने निवडूण येतील असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे.त्या अनुषंगाने जोरदार प्रचार यंत्रणा राबवली जात आहे. विशेष म्हणजे नाईक यांचे एकाकाळचे शिष्य दीपक निकम सुध्दा आपल्या गुरूंच्या प्रचारात उतरले आहेत.त्यांनी मतदारसंघात गाठीभेटी घेतल्या  आहेत.

गणेश नाईक शिवसेनेत असताना त्यांचा रायगड जिल्ह्यातही प्रभाव होता. त्यांनी गावागावात शिवसेनेच्या शाखा उघडल्या. लालबावटयाचा प्रभाव क्षेत्रात  भगवा आणला. त्याचबरोबर श्रमिक सेनेच्या माध्यमातून या भागातील कामगारांचे प्रश्न सोडवले. त्या दरम्यान पनवेल परिसर मोठया संख्येने शिवसैनिक गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली काम करीत होते. त्यामध्ये  सेनेचे पनवेल विधानसभा संघटक दीपक निकम आघाडीवर होते. ते गणेश नाईक यांचा या भागातील उजवा हात समजला जात होता. निकम श्रमिक सेनेचे सरचिटणीस म्हणून काम पाहत असे. सुरूवातीला आनंद दिघे आणि त्यानंतर नाईक यांच्या समवेत त्यांनी काम केले. कट्टर आणि हाडाचे शिवसैनिक असलेल्या दीपक निकम पनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर यांचा प्रचार करून युती धर्म निभावत आहेतच. त्याचबरोबर त्यातुन जो वेळ मिळेल तो आपल्या  गुरूच्या प्रचारात देत आहेत. ऐरोली मतदारसंघातील ओळखीच्या मतदारांच्या त्यांनी गाठीभेटी घेत गणेश नाईक यांना प्रचंड मताधिक्याने निवडूण देण्याचे आवाहन केले आहे. यामाध्यमातून ते आपला शिष्याचे कर्तव्य निभावत आहेतच. त्याचबरोबर भाजपच्या कमऴ चिन्हावर नाईक निवडणुक लढवत असल्याने युती धर्माचेही पालन करताना दिसत आहेत.

निवडणुकीसाठी दिल्या शुभेच्छा

दरम्यान दीपक निकम यांनी गुरूवारी गणेश नाईक यांची भेट घेवून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी खासदार संजीव नाईक, ज्ञानेश्वर नाईक, दशरथ भगत, शिवसेनेचे तालुका संघटक भरत पाटील, अंकुश कडव, दिपेश साळकर उपस्थित होते.