प्रधानमंत्र्यांना जिल्‍हा संघटन मंत्र्यांकडून ब्रिफ

 

श्रीनंद पटवर्धन यांनी केले हेलिपॅडवर स्वागत

नाना करंजुले
पनवेल/ प्रतिनिधी: – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी खारघर येथे चार विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची प्रचार सभा घेतली. मोदी यांचे हेलिपॅडवर सर्वात अगोदर जिल्हा संघटनमंत्री श्रीनंद पटवर्धन यांनी स्वागत केले. त्यानंतर प्रचार सभेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पंतप्रधानांना माहिती दिली
16 ऑक्‍टोबर रोजी दुपारी साडे तीन वाजता सेंटर पार्कच्या बाजूला असलेल्या मोकळ्या मैदानावर पंतप्रधानांनी सभा घेतली. ते हेलिकॉप्टरने सभास्थळी आले. दरम्यान हेलिपॅडवर संघटन मंत्री म्हणून श्रीनंद पटवर्धन सर्वात अगोदर उभे होते. त्यांच्यासमवेत महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपाचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत, उपस्थित  होते. या सर्वांनी पंतप्रधानांचे खारघर नगरीत स्वागत केले. त्यानंतर मोदी यांनी पटवर्धन यांच्याकडून उमेदवार त्याचबरोबर त्यांच्या मतदारसंघाची नावे विचारले. त्यांनी त्वरित याबाबतची माहिती दिली. मागील निवडणुकीत यापैकी कोणते उमेदवार निवडून आले याचीही विचारणा पंतप्रधानांनी केली.जिल्हा संघटन मंत्र्यांनी त्यांची ही नावे सांगितले. सोमवारी मतदान असल्याने अगोदरचा दिवस रविवार आहे. सलग दोन दिवस सुट्टी अाहे मग तुम्ही मतदान कसे घडवून आणणार अशी विचारात पाडणारा प्रश्न नरेंद्र मोदी यांनी विचारला. एक बुथ पंचवीस कार्यकर्ते असे नियोजन येथेही केले आहे. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून मतदान होईल असा विश्वास श्रीनंद पटवर्धन यांनी पंतप्रधानांना दिला. विचारलेल्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाल्यानंतर चला मग मी भाषण करतो. असे सांगून ते व्यासपीठाच्या दिशेने गेले. गेली अनेक वर्ष भारतीय जनता पक्षात निष्ठेने काम करणाऱ्या पटवर्धन यांना थेट पंतप्रधानांचे सर्वप्रथम स्वागत करता आले. त्यांच्याशी संवाद साधण्याचा योग मिळाला. तसेच त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची योग्य पद्धतीने उत्तर देता आले. याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

सभागृह नेत्यांकडून पंतप्रधानांना पुस्तक भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुलाब पुष्प देऊन हेलिपॅडवर इतरांनी स्वागत केले. मात्र पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी फुला ऐवजी विक्रम संपत लिखित ‘सावरकर’ या पुस्तकाची पंतप्रधानांना भेट दिली. त्यांनीही अतिशय आनंदाने ही भेट स्वीकारत ठाकूर त्यांच्याशी हस्तांदोलन करीत स्मित हास्य केले.