पनवेलच्या जनतेचे भिडु ….कांतीलाल कडू!


अपक्ष उमेदवार कांतीलाल कडू यांच्या प्रचार वाक्याची चर्चा
होर्डिंग द्वारे शिट्टीने पनवेलकर यांचे लक्ष वेधले
पनवेल प्रतिनिधी:- जनतेचा भिडु कांतीलाल कडू! हे प्रचार वाक्य पनवेल विधानसभा मतदारसंघात चांगलेच चर्चिले जात आहे. अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात असलेल्या कडू यांचे प्रचाराचे होर्डिंग सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. पनवेलच्या इतिहास अशाप्रकारे अपक्ष उमेदवारांने पहिल्यांदाच रणधुमाळीत धुरळा उडवला आहे.
काँग्रेसचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष असलेल्या कांतीलाल कडू यांनी अपक्ष उमेदवार म्हणून गेल्या काही दिवसात प्रभावी प्रचार केला आहे. त्यांनी विविध सामाजिक संस्था, व्यक्तींच्या गाठीभेटी घेतल्या. त्याचबरोबर सोशल मीडियावर सुद्धा प्रचार सुरू आहे. पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीत महत्वाच्या ठिकाणी होर्डिंग्ज लावले आहेत. त्यामध्येही पनवेला हवा समर्थ पर्याय,जनतेचा भिडु कांतीलाल कडु ,शिट्टी चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन पनवेलकर यांना करण्यात आले आहे. नवीन पनवेल सिग्नल, आसुडगाव आणि कोपरा येथे लावण्यात आलेल्या प्रचाराचे होल्डिंग सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.