सहकारी बँकेच्या घोटाळयात येथील विरोधी उमेदवारही

 

उदयनराजे भोसले यांचा रोहित पवार यांच्यावर निशाना

 प्रा. राम शिंदे यांच्या प्रचारार्थ सभेला उर्स्फूत प्रतिसाद

कर्जत /प्रतिनिधी- काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात मोठमोठे घोटाळे व ईडी आली .  पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना राज्य सहकारी बँकेचे घोटाळयांची चौकशी करण्याकरीता स्वाक्षरी केली. त्यानुसार कार्यवाही सुरू झाली आहे. त्यामध्ये येथील उमेदवार सुध्दा अडकले असल्याचे मी ऐकले आहे. यांनी जनाची नाही तर मनाची तरी ठेवली पाहिजे होती. या शब्दात उदयनराजे भोसले यांनी रोहित पवार यांच्यावर निशाना साधला. राशीन येथे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

खासदार डाँ सुजय विखे यांच्या प्रमुख उपस्थित पार पडलेल्या या सभेला मोठया प्रमाणात गर्दी जमली होती. मी अर्ज भरण्याकरीता येणार होते. मात्र  पावसामुळे  मला येता आले नाही  याबाबत प्रा.राम शिंदे यांनी हवामानाचा विषय काढला. पण आजचे वातावरण पाहता ते पुढचे आमदार शंभर टक्के होणार. शिंदे यांच्या नावावर मी शिक्कामोर्हतब करतो असेही उदयनराजे म्हणाले. ते सरपंच पदावरून पुढे आले. आमदार झाले त्यानंतर महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात मंत्री झाले. हे सर्व शक्य झाले ते म्हणजे तुमच्या आर्शिवादामुळे यापुढेही त्यांना अशीच साथ दया असे आवाहन उदयनराजे भोसले यांनी केले.   रामभाऊंनी सर्वांना बरोबर घेवून सर्वमान्यांना केंद्रबिंदु मानत वाटचाल केली. काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांनी गेल्या पन्नास वर्षात जनतेचे दिवाळे काढले असल्याचा आरोप त्यांनी केला. भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना गोपिनाथ मुंडे यांनी कृष्ण खोरे प्रकल्प आणला. आणि यातून काँग्रेस राष्ट्रवादी वाल्यांनी  पैसे खालले असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. लोकांसमोर जाताना हे तेच लोकांचे कैवारी असल्याचे भासवतात.  मराठा समाजाला त्यांनी गेली कित्येक वर्ष झुलवत ठेवले, धनगर समाजाला आरक्षण दिले नाही. हे काम भारतीय जनता पक्षाने केले आहे. त्यामुळे समाजाची तळमळ असलेल्या तुमचा मुलगा , भाव आणि सर्वसामान्य व्यक्ती असलेल्या प्रा. राम शिंदे यांच्या पाठीमागे उभे रहा असे आवाहन उदयनराजे यांनी उपस्थित केले.

आत्मक्लेश ऐवजी आत्मचिंतन करा….

आमच्याकडे येथील उमेदवाराचे काकांनी मध्यंतरी आत्मक्लेशाकरीता आले होते. त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी तिथे बसले. त्यांनी आत्मक्लेश करण्याऐवजी आत्मचिंतन करण्याची गरज होती असा टोला उदयनराजे यांनी अजित पवार यांना लगावला.

 शरद पवारांना टोला…

राष्ट्रवादी काँग्रेस विचार करण्यापलीकडे गेले आहेत. कधी समोरच्याच्या  मुस्कटात तर केव्हा कोपरखिळी मारायची हे काय चालु आहे असा सवाल उदयनराजांनी करीत शरद पवार यांना टोला मारला.