कर्जत-जामखेडमध्ये भाजपचा राम शिल्लक राहिला नाही

चोवीस तारखे आगोदर शरद पवारांची वर्तमानपत्रातील  हेडिंग तयार 

रोहित पवारांच्या प्रचारार्थ घेतली सभा 

कर्जत/प्रतिनिधी कर्जत-जामखेड येथील सभेला मिळालेला जनतेचा प्रतिसाद पाहता ही निवडणूक झाली की, २४ तारखेला निकाल लागेल. आणि  कर्जत-जामखेडमध्ये भाजपाचा राम शिल्लक राहिला नाही, ही हेडलाईन राज्यातील तमाम वर्तमानपत्रांची असेल असे सांगेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तुफान फटकेबाजी करीत रोहित पवार जिंकून येतील असा विश्वास व्यक्त केला.

रोहित पवार यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांनी  कर्जत- जामखेड मतदारसंघात   शनिवारी शेवटच्या दिवसी सभा घेतली. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्रात सध्या कर्जत-जामखेडचीच चर्चा सुरु आहे. इथल्या तरुणाने भाजपाची झोप उडवली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री तीन-तीन सभा कर्जत-जामखेडमध्ये घेत आहेत.  ५२ वर्षांपुर्वी आज रोहित ज्या वयात आहे त्या वयात मी विधानसभेला उभा होतो. बारामतीमध्ये त्यावेळी काही नव्हते. त्या गावाचा चेहरा बदलण्याची संधी मिळाली. परिवर्तन झालं. रोहितने कर्जत-जामखेडची गेली पाच वर्षे जबाबदारी घेतली आहे. या गावाची ओळख दुष्काळी भाग आहे. त्यावेळी दुष्काळ बघायला पंडीत नेहरु, इंदिरा गांधी आल्या होत्या. या तरुणाने याविभागाचा चेहरामोहरा कसा बदलला हे बघायला यापुढील दिवसात पंतप्रधान आल्याशिवाय राहणार नाहीत असेही शरद पवार म्हणाले.रोहित पाच वर्षांत अनेक विकासकामे, प्रकल्प या भागासाठी उभे करेल. बारामतीत विकास व्हायला २० वर्षे लागली परंतु रोहितला साथ लाभली तर तो कर्जत-जामखेडमध्ये ते पाच वर्षांत करुन दाखवेल, याची मला खात्री असल्याचेही पवार म्हणाले.