कितीही पवार कुटुंब लटकलं तरी हा पठ्ठया घाबरत नाही

 

प्रचाराच्या सांगता सभेत प्रा. राम शिंदे यांचे आक्रमक भाषण
डॉ. सुजय विखे यांची पालकमंत्र्यांनी करीता कर्जत-जामखेड करांना साद
कर्जत/ प्रतिनिधी: कितीही पवार कुटुंब लटकलं तरीहा हा पठ्ठया घाबरत नाही. कारण मला तुमची साथ आणि ताकत आहे. अशा शब्दात प्रा. राम शिंदे यांनी कर्जत येथे पार पडलेल्या सांगता सभेत रोहित पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीकास्त्र सोडले. खासदार डॉ. सुजय विखे यांनी पालक मंत्र्यांसाठी कर्जत-जामखेड करांना भावनिक साद घातली.

भांडेवाडी,कर्जत येथे भव्य विजय संकल्प सभा पार पडली.याप्रसंगी मा.खासदार डॉ. सुजय विखे पाटील व माजी खासदार श्री.दिलीप गांधी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

मोठ्या जनसमुदायाला संबोधित करताना प्रा. राम शिंदे म्हणाले की ज्याचं जळतं त्याला कळतं. आपल्या भागात दोन महिने येऊन प्रश्न समजणार आहेत का ? आपल्याला कृष्णा भीमा आणि सीना नदीजोड प्रकल्प करायचा आहे. त्यासाठी 10 हजार कोटी रुपयांचा खर्च येऊ शकतो. जर आपल्याला आपली शेती सिंचनाखाली आणायची असेल तर आपला लोकप्रतिनिधी निवडून देणे गरजेचे असल्याचे मत प्रा. शिंदे यांनी व्यक्त केले. हे म्हणतात आम्ही पाणी आणणार. अहो यांनी आपले आलेले पाणी अडवले ते कुठून पाणी देणार. अशा शब्दात त्यांनी रोहित पवार यांना टोला लगावला.
खासदार डॉ. सुजय विखे पवार कुटुंबीयांवर शरसंधान म्हणाले की अहमदनगर जिल्ह्याच्या इतिहासात इतक वाईट राजकारण झालं नव्हतं ते गेल्या काही महिन्यात कर्जत जामखेड मध्ये सुरू आहे. विरोधी उमेदवाराने आमिष, प्रलोभने देऊन मोठ्या प्रमाणात राजकारण सुरू केलं. आर्थिक वापर करून काहीजणांना फोडले. परंतु कर्जत-जामखेड करांनो मला एकच सांगायचे आहे की, निवडणुकीपुरते जे टँकर चालले ते कायम चालणार आहेत का?. जे आर्थिक प्रलोभनाला बळी पडून त्यांच्यात गेले आहेत ते कायम राहणार आहेत का.? आपल्या तरुण पिढीला अंधारात ढकलण्याचे काम यांनी केले असल्याचा आरोप डॉ. विखे-पाटील यांनी केला. पवार कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती येथे येऊन म्हणते की कर्जत जामखेड चे बारामती करणार. तुम्ही बारामतीचा इतका विकास केला तर तुम्हाला पन्नास सभा का घ्यावे लागल्या असा सवाल खासदारांनी उपस्थित केला. काहीजण म्हणतात सुजय विखे पाटील रोहीत परिवारांना घाबरले. त्यांना भीती आहे रोहित आला ती पुढे खासदारकीच्या निवडणुकीला सुजयला त्रास होईल. आमचे आणि पवार कुटुंबीयांचे गेल्या पन्नास वर्षापासून जमत नाही. आणि आम्ही कोणालाही घाबरत नाही. पालकमंत्र्यांनी गेल्या पाच वर्षात या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत. एका सामान्य माणसाने इतके मोठे काम केले आहे. तुम्ही सत्तेपासून दूर राहू नका असे आवाहन डॉ सुजय विखे पाटील यांनी केले. प्रा. राम शिंदे यांच्या कोणत्या शिक्षण संस्था नाहीत वा कारखाने नाहीत. त्यांच्याकडे गरीब जनता आहे. त्याच विश्वासावर ते निवडून येतील असा विश्वास खासदार डॉ विखे यांनी व्यक्त केला.