निलेश लंके…. निलेश लंके…आणि निलेश लंके

 

 

 


पारनेर – नगरकरांनी निवडणूक घेतली डोक्यात.. अन डोक्यावर
नाना करंजुले
पारनेर /प्रतिनिधी: – पारनेर – नगर विधानसभा मतदारसंघात प्रथमच थेट जनतेने निवडणूक डोक्यात घेतली. आणि निलेश लंके नावाच्या सर्वसामान्य व्यक्तीला अक्षरशः डोक्यावर घेतले. जिकडे तिकडे निलेश लंके… निलेश लंके… आणि निलेश लंके हे पाच अक्षरी नावाच चर्चिले जात आहे. निवडणुकीचा निकाल काही लागो परंतु या मतदारसंघात लोकांनी निवडणूक हातात घेत. प्रचारादरम्यान कमालीचा उत्साह दाखवून दिला.
पारनेर – नगर हे दोन तालुके तसे दुष्काळ सदृश्य आहेत. येथे सिंचनाच्या सुविधा नसल्याने वरुणराजाच्या कृपेवर सर्व काही अवलंबून असतं. त्यामुळे अनेक कुटुंब नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबई, नवी मुंबई, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, ठाणे, बोईसर या परिसरात स्थायिक झाले. परंतु त्यापैकी कित्येकांनी आपल्या मातीशी असलेली नाळ टिकवून ठेवले. तालुक्याचा, गावाचा विकास झाला पाहिजे सर्वसामान्य माणसाच्या हाती नेतृत्व केले पाहिजे हा विचार गेल्या दोन-अडीच वर्षांपासून प्रत्येकाच्या डोक्यामध्ये घोंगावत राहिला. आणि पारनेर नगरकरांना निलेश लंके यांच्या रूपाने एक पर्याय मिळाला. निवडणूका येतात आणि जातात. मतदान होतं, मतमोजणीनंतर निकाल बाहेर येतात. कुठे खुशी तर कुठे गम दिसतो. जिंकलेले गुलाबा उधळला जातो, जल्लोष केला जातो या सर्व गोष्टी नैसर्गिक आहेत. परंतु या सर्वातून जनसामान्य आणि सर्वसामान्य आपलं हक्काचं नेतृत्व उदयाला आला आहे. हे समाजाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच आहे. निवडणूका संपल्या की सर्वकाही कागदावरच राहत. जनतेचे प्रश्न, त्यांच्या अडीअडचणी फक्त निवडणुकीच्या काळात समजून घेतले जातात. पाच वर्षात त्या सुटतील असं काही नसत. परंतु दीड दशकांपेक्षा जास्त काळ लोकांमध्ये मिळून-मिसळून राहणाऱ्या नेतृत्वाचा राजकीय-सामाजिक क्षेत्रात उदय झाला. या विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून जनतेचा हा हिरा खऱ्या अर्थाने चमकला.24 तास 365 दिवस लोकांच्या मध्ये राहणारा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पारनेर नगर विधानसभा मतदारसंघ उतरवला. गर्दी – लोकप्रियता आणि संवेदनशीलतेचे दुसर नाव नाव म्हणजे निलेश ज्ञानदेव लंके होय . कमालीची लोकप्रियता, जनतेचे प्रेम लाभलेल्या या नेतृत्वाने , लोकांचे पाठबळ व ताकतीवर पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदाच आव्हान निर्माण केले. दोन महिने अगोदर काढण्यात आलेल्या जनसंवाद यात्रेत निलेश लंके यांना जनतेने निवडणूक लढवण्यासाठी निधी जमा करून दिला. प्रत्येक गावात, वाडीवस्तीवर त्यांचे स्वागत झाले. बांधावर, मंदिरात आणि पडवीत त्यांनी बैठक मारली.19 दिवस विधानसभा मतदारसंघाचा दौरा केला. येथील जनतेशी संवाद साधला, त्यांच्या अडचणी प्रश्न जाणून घेतले. आणि भविष्यात त्याची सोडवणूक करण्याची आश्वासक आश्वासन दिले. विधानसभेची निवडणूक जाहीर झाली.लंके यांना उमेदवारी मिळाली. गावोगाव प्रचार सुरू झाला आणि पुन्हा एकदा वादळ पारनेर आणि नगर मध्ये घोंगावले. कधी घोड्यावर तर कधी खांद्यावर घेऊन त्यांची मिरवणूक काढण्यात आली. घोंगडी बैठकांचे मोठ्या सभांमध्ये रूपांतर झाले. रॅलीमध्ये ग्रामस्थांनी सहभागी होऊन तालुक्यात परिवर्तन करण्याचे संकेत दिले. 21 ऑक्टोबर रोजी ही सर्व लोकप्रिय आता ईव्हीएम मशीन मध्ये बंद होणार.24 तारखेला निकाल हाती येईल. कोणाचा विजय कोणाचा पराभव होईल. हा निवडणूक प्रक्रिया चा एक भाग आहे. परंतु या निमित्ताने जनसामान्यांना एक आश्वासक शाश्वत नेतृत्व मिळाल याचं समाधान पारनेर नगर मधील जनतेमध्ये असणार.