पश्चिम महाराष्ट्र सामाजिक संस्था भाजपसोबत

 

 

आ. प्रशांत ठाकूर यांना  जाहिर केला पाठिंबा

रामशेठ ठाकूर यांनी केले स्वागत

पनवेल/प्रतिनिधी-  पनवेल विधानसभा मतदारसंघात   पश्चिम महाराष्ट्र सामाजिक संस्थेच्या वतीने भारतीय जनता पक्षाला  पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. संस्थेचे अध्यक्ष भिमराव पोवार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी माजी खासदार रामशेठ ठाकूर यांची भेट घेवून आमदार प्रशांत ठाकूर यांना पाठिंब्याचे पत्र दिले.  

पनवेलसह सिडको वसाहतीत मोठया प्रमाणात पुणे, सोलापुर, सांगली, सातारा, कोल्हापुर येथील मुळ रहिवाशी नोकरी व्यवसायानिमित्त राहण्यासाठी आलेले आहेत. मुळ पश्चिम महाराष्ट्रील मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. या रहिवाशांना एकत्रित करून भिमराव पोवार यांनी पश्चिम महाराष्ट्र सामाजिक संस्थेची स्थापना केली आहे. पोवार यांनी सर्व सदस्यांची बैठक घेवून त्यांचे मत जाणून घेतली त्यानुसार संस्थेने भारतीय जनता पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शनाखाली देश राज्य प्रगतीपथावर आहे. त्याचबरोबर माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांचे नेतृत्व पनवेलचा सर्वांगिण विकास करीत आहेत. त्यांना पश्चिम महाराष्ट्रवाशीयांच्या समस्या माहिती आहेत. त्याची सोडवणुक करून आपल्याला न्याय देतील असा विश्वास भिमराव पोवार यांनी व्यक्त केला आहे. माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी संस्थेच्या भूमिकेचे स्वागत केले.