पनवेल करांना चोवीस तास पाणी देईल

 

 


अपक्ष उमेदवार कांतीलाल कडू यांचे अभिवाचन
पनवेल /प्रतिनिधी:- पनवेल परिसरात तीव्र पाणीटंचाई आहे. त्यामुळे नागरिक नो डेव्हलपमेंट नो वोट. नो वॉटर नो वोट या मतांवर आतापर्यंत आले आहेत. मला जर पनवेलकरांनी संधी दिली. तर चोवीस तास मुबलक पाणी देईल असे अभिवचन अपक्ष उमेदवार कांतीलाल कडू यांनी दिले आहे. ते शिट्टी या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत.
कांतीलाल कडू यांनी गेल्या दहा पंधरा दिवसात सत्ताधारी आणि विरोधक यांना टीकेचे लक्ष्य करून आपला पर्याय कसा योग्य आहे. हे पनवेलच्या जनतेला पटवून देण्याचा प्रयत्न केला. महापालिका हद्दीत सुरू असलेल्या पाणीटंचाईवर दृष्टीक्षेप टाकत मी आमदार झाल्यानंतर हा प्रश्न एक हजार टक्के निकाली काढेल असे आश्वासन त्यांनी दिली आहे. आपण याअगोदरच मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव दिला आहे. जलअमृत योजनेतून फक्त जलवाहिन्या बदलणे येणार आहेत. पण जलकुंभाच्या त्यामध्ये समावेश नाही. जर ते नसेल तर पनवेल करांना पाणीपुरवठा करणार कसा असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यासाठी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात जलकुंभ उभारून त्यामार्फत पाणी पुरवठा करण्याचे नियोजन कांतीलाल कडू यांनी सांगितले आहे. त्यामुळे पाणी साठवणूक क्षमताही वाढणार असल्याचेही ते म्हणाले. पनवेलला मुबलक पाणी मिळावे यासाठी कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्यास शासनाला भाग पाडू असेही कडू यांचे आश्वासन आहे. खड्डेमुक्त रस्ते हा कांतीलाल कडू यांच्या वचनाचा प्रमुख भाग आहे. आपण विधानसभेत गेल्यानंतर सर्वात अगोदर टक्केवारी घेणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली करणार. तुम्हाला पनवेलला काम करायचे असेल तर पैसे खाता येणार नाहीत. असे त्यांना निक्षुन सांगू, पनवेल ला सुसज्ज आणि चांगले रस्ते देणार असल्याचे अभिवचन त्यांनी दिले आहे. सिडको वसाहतीतील आरक्षित भूखंडावर उद्यान आणि क्रीडांगण विकसित करणार. ज्येष्ठ नागरिकांकरिता विरंगुळा केंद्र उभे केले जाणार असल्याचेही त्यांनी आश्वासन दिले आहे. पनवेल आयटीआय, बसस्थानकाचे सुशोभीकरण आपण करून घेऊ असेही अपक्ष उमेदवारांनी सांगितले. पनवेल परिसरातील खाजगी शाळांकडून घेतले जाणारे अवास्तव शुल्क नियंत्रण करण्यासाठी आवाज उठवणार. पनवेल विधानसभा मतदारसंघात दर्जेदार आरोग्य सुविधा आपण आमदार झाल्यानंतर देऊ अशी ग्वाही अपक्ष उमेदवार कांतीलाल कडू यांनी दिली आहे. पनवेल करांनो मला एकदा संधी द्या त्याचे मी सोने करून दाखवेल. तुमच्या मदतीसाठी अडीअडचणीच्या काळात 24 तास 365 दिवस तत्पर राहील असे वचन कडू यांनी मतदारांना दिले आहे.