खासदारांनी केले आमदारकीसाठी मतदान

 

 


डॉ सुजय विखे यांनी केले सपत्नीक मतदान
शिर्डी/ प्रतिनिधी: – नगर दक्षिण चे खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी आपल्या पत्नी धनश्री यांच्यासमवेत सोमवारी आमदारकीचा निवडणुकीत मतदान केले. त्यांच्यासमवेत स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला व्हाईट वाॅश देण्याची आव्हान डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिले होते. त्यानुसार त्यांनी पायाला भिंगरी लावून जिल्ह्यात प्रचार केला. सोमवारी त्यांनी मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावले.