पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले मतदान

 

चोंडी येथे बजावले राष्ट्रीय कर्तव्य
जामखेड/ प्रतिनिधी: – अहमदनगर चे पालकमंत्री प्रा. राम शिंदे हे तिसऱ्यांदा कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून आपले नशीब आजमावत आहेत. सोमवारी सकाळी त्यांनी चोंडी येथील मतदान केंद्रावर मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावले. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबीयांनीही मतदान केले
सकाळी मतदानाला जाण्याच्या अगोदर प्रा .राम शिंदे यांनी आपल्या आई-वडिलांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर त्यांच्या पत्नी पंचायत समितीचे माजी सभापती आशाताई शिंदे आणि मुलींनी औक्षण केले. दरम्यान प्रा .राम शिंदे यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारकात जाऊन मनोभावे दर्शन घेतले. त्यानंतर ते आपल्या संपूर्ण कुटुंबियासह चोंडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर गेले. तिथे मतदानाचा हक्क बजावला . हा लोकशाहीचा उत्सव आहे यामध्ये सर्वांनी सहभागी होऊन मोठ्या संख्येने मतदान करावे असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. त्यानंतर ते मतदार संघातील इतर मतदान केंद्रांना भेटी देण्यासाठी रवाना झाले.