शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही  केले मतदान

 

शिवसैनिक व नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन

पनवेल/प्रतिनिधी-  पनवेलमधील शिवसेनेच्या  पदाधिकाऱ्यांनी सोमवारी मतदान केले. त्यांनी शिवसैनिक तसेच नागरिकांना मोठया संख्येने मतदान करून लोकशाहीच्या या उत्साहात सामील होण्याचे आवाहन केले. दरम्यान शिवसैनिकांनी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांबरोबर समन्वय साधून मतदान घडवूण आणण्यासाठी परिश्रम घेतल्याचे दिसून आले.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिरिष घरत, महानगरप्रमुख रामदास शेवाळे, पनवेल विधानसभा संघटक दीपक निकम, तालुका संघटक भरत पाटील यांनी अनुक्रमे  खारघर, कळंबोली आणि पनवेल येथील मतदान केंद्रावर जावून राष्ट्रीय कर्तव्य बजावले. त्यांच्या समवेत कुटुंबियांनीही मतदान केले. त्यानंतर सेनेच्या या पदाधिकाऱ्यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघात जावून त्या ठिकाणचा आढावा घेतला. महायुतीने लावलेल्या बुथला भेटी देत कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले.