हक्क आणि कर्तव्य शांततेत पडले पार

 

कायदा आणि सुव्यवस्था राहिला अबाधीत

नवी मुंबई पोलीसांकडून उत्तम नियोजन

नाना करंजुले

पनवेल/प्रतिनिधी- १८ वर्ष पुर्ण झालेल्या  प्रत्येकाला घटनेने मतदानाचा अधिकार दिलेला आहे. त्याचबरोबर मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य सुध्दा मानले जातो. ते पनवेल, उरण आणि नवी मुंबईत सोमवारी शांततेत पार पडले. अर्थात त्याकरीता नवी मुंबई पोलीसांनी  योग्य त्या खबरदारी व उपाययोजना केल्या  होत्या. कडक पोलीस बंदोबस्त, प्रबोधन आणि  उत्तम नियोजनचा हा सकारात्मक परिणाम  दिसून आला. त्यामुळे मतदान प्रक्रियेला कुठेही गालबोट लागला नाही तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहिली. 

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पनवेल, उरण, बेलापुर आणि ऐरोली  या चार विधानसभा  मतदार संघाचा समावेळ आहे . विधानसभा  निवडणुक म्हणजे  लोकशाहीचा उत्सव  असतो. तो शांततेत पार पडावा या दृष्टीकोनातून  नवी मुंबई पोलीसांनी  विशेष खबरदारी घेतली होती. या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले गुन्हेगार तडीपार करण्यात आले होते . काहींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली, नोटीसा बजाविण्यात आल्या. या व्यतिरिक्त  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकिय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यांना कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा येणार नाही. याबाबत खबरदारी घेण्याचे आवाहन केले.याव्यतिरिक्त  पोलीसांनी  प्रचार सभा, पदयात्रा, गाठीभेटी याशिवाय इतर गोष्टीवर सुक्ष्म नजर ठेवली. पोलीस आयुक्त संजयकुमार, सहआयुक्त राजकुमार व्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त अशोक दुधे , पंकज डहाणे, शिवराज पाटील आणि सुरेश मेंगडे    यांनी मतदान प्रक्रियेकरीता कडक बंदोबस्त तैनात केला होता. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीत असलेल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना प्रोत्साहन दिले होते. याशिवाय बाहेरून एसआरपीचे  मनुष्यबळ मागविण्यात आले होते. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी खडा पहारा देत मतदान प्रक्रियेत कोणतीही बाधा येवून दिली नाही. मतदान केंद्रावर सुध्दा पोलीस यंत्रणा दक्ष असल्याने सर्व काही सुरळीत आणि शांततेत पार पडले. पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार मतदानाच्या काळात  पोलीसांच्या  सुट्टया रद्द करण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर  आगोदर स्थापन केलेल्या भरारी स्थिर पथकात पोलीसांनी  महत्वाची भूमिका बजावली. नवी मुंबई पोलीसांच्या   उत्तम नियोजनामुळे  कोणताही अनुचित प्रकार दोनही मतदारसंघात घडला नाही आणि ही यंत्रणा शांतेत पार पाडण्यास पोलीसांचे  योगदान महत्वाचे ठरले.

पोलीस आयुक्तांचे होते बारिक लक्ष

नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजयकुमार यांनी स्वताः  मतदान बंदोबस्तावर विशेष लक्ष दिले होते. विशेष म्हणजे त्यांनी सोमवारी विविध मतदान केंद्रांना भेटी दिल्या. संवेदनशील मतदान केंद्रावर जावून त्या ठिकाणचा आढावा घेतला. पोलीस आयुक्त दक्ष असल्याने इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सुध्दा कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची खबरदारी घेतल्याचे दिसून आले.  

 नवी मुंबई पोलीसांनी केला कोकणात बंदोबस्त

केवळ  पनवेल आणि नवी मुंबईतच नाही. तर येथील पोलीस आयुक्तालयातील सातशे पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी रायगड,रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे बंदोबस्ताकरीता गेले होते. त्या ठिकाणीही नवी मुंबई पोलीसांनी  कर्तव्य बजावले.