निलेश लंकेंचा विजय राज्यातलं परिवर्तनाचं एक आगळंवेगळं उदाहरण

 

 

र्वसामान्य कुटुंबातील एखादा तरुण गावोगावी व्यापक जनसंपर्क निर्माण करतो.ज्या पक्षात वाढतो त्या पक्षात आडकाठी आल्यानंतर पक्ष बदलून राष्ट्रवादीचा पर्याय स्वीकारतो.त्याची टक्कर असते आपल्याच मूळ पक्षातील तीन पंचवार्षिक निवडून आलेल्या विधानसभेचे उपाध्यक्ष असलेल्या एका प्रस्थापित नेत्याशी.
भल्याभल्यांना अवघड वाटणारा पारनेर हा विधानसभा मतदार संघ.मात्र निलेश लंके,एका प्राथमिक शिक्षकांच्या कुटुंबात जन्मलेला एक सामान्य तरुण वादळ निर्माण करतो.विजय औटींच्या सततच्या अपमानास्पद वागणुकीला कंटाळलेली सर्वसामान्य जनता हिशोब चुकता करण्यासाठी संधीच्या शोधात असते.तळागाळातल्या गोरगरीब कष्टकऱ्याला सहज २४तास उपलब्ध असणारं नेतृत्व,प्रेमाने समस्या ऐकून घेणारं,सोडवणारं नेतृत्व हवं असतं.या मतदार संघातील नगर तालुक्यातील गावांना दुजाभावाची वागणूक न देता आपलंसं करणारा आमदार हवा असतो.निलेश लंकेंच्या रूपाने हा पर्याय समोर येतो.
19 दिवस स्वतःच्या घरी न जाता रात्रंदिवस अथक परिश्रम घेत जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून गावागावात जाऊन संपर्क निर्माण करीत,गावोगावचे प्रश्न जाणून घेणारे निलेश लंके पारनेर मतदारसंघातील जनतेला भावतात.अशा परिस्थितीत लंकेंच्या विरोधात सर्व प्रस्थापित नेते अर्थात चांडाळ चौकडी एकत्र येऊन विद्यमान प्रस्थापित नेतृत्वाला साथ देतात.या लढवय्या तरुणाला एकटा पाडण्याचे सर्व प्रयत्न होतात.मात्र सर्वसामान्य जनता या तरुणाच्या मागे उभी राहते.मा.शरद पवार साहेबांच्या विचाराला मानणारे काही कार्यकर्तेही साथीला येतात.सर्वमिळूण मतदारसंघ पिंजून काढतात.निवडणूक जनता हातात घेते.नेते एकीकडे व जनता दुसरीकडे अशी स्थिती या मतदारसंघात पहिल्यांदाच पाहायला मिळाली.
जनतेने गावोगावी उस्फूर्तपणे लंकेंसाठी निधी उभा केला.कशाची अपेक्षा न करता,बड्या नेत्यांच्या दबावाला,प्रलोभनांना बळी न पडता अगदी कमी खर्चात निलेश लंके थोड्या थोडक्या नाही तब्बल 60838 मतांनी निवडून आले आहेत.139963 एवढ्या मोठ्या संख्येचे नगर जिल्ह्यातील सर्वाधिक मतदान निलेश लंके यांनी प्राप्त केले आहे.
पारनेर नगर मतदार संघातील जनतेने खऱ्या अर्थाने परिवर्तनाच्या विचाराला चालना दिली आहे.सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी व या मतदारसंघातील शेतीचे,पाण्याचे व्यापक प्रश्न व सुशासन यावर कटाक्षाने काम करून हा मतदारसंघ राज्यातला मॉडेल मतदारसंघ बनविण्यासाठी निलेश लंके प्रयत्न करतील अशी अपेक्षा सर्वांचीच आहे.या प्रयत्नांत आमच्या सारखे असंख्य कार्यकर्ते त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यास कटिबद्ध आहेत.निलेश लंके यांना सर्वसामान्यांनी ‘नेते’ ही पदवी आधीच बहाल केली होती,आता आमदार करून या पदवीस जनतेने अधिकृत मान्यताच दिली आहे.निलेश लंके यांच्या विजयानंतर जल्लोषासाठी पारनेर येथे जमलेला हजारोंचा जनसमुदाय याची साक्ष देतो. जनतेच्या या विश्वासास नेते अर्थात आमदार लंके निश्चितच न्याय देतील असा विश्वास आहे.
आमदार निलेश लंके यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा! जय शिवराय!

— संजीव भोर,
संस्थापक अध्यक्ष शिवप्रहार महाराष्ट्र.
मो.9921381181