बचेंगे तो और भी लढेंगे….

 

 

 

पंडितशेठ पाटील यांचा शेकाप कार्यकर्त्यांना संदेश
अलिबाग/ प्रतिनिधी: – शेतकरी कामगार पक्षाची परंपरा आहे की पराभव झाल्यावर पळत नाही. आणि विजय मिळाल्यावर उन्मात करीत नाही. बचेंगे तो और भी लढेंगे या शब्दात शेतकरी कामगार पक्षाचे अलिबाग येथील माजी आमदार पंडितशेठ पाटील यांनी कार्यकर्त्यांना संदेश देत त्यांना खचून न जाण्याचे आवाहन केले.
अलिबाग विधानसभा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाचा अनपेक्षित पराभव झाला. गेल्या अनेक वर्षाचा लालबावटा चा गड शिवसेनेच्या महेंद्र दळवी यांनी काबीज केला. या पार्श्वभूमीवर शेकापच्या कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचू नये म्हणून पंडित शेठ पाटील आणि माजी मंत्री मीनाक्षीताई पाटील यांनी पक्षाच्या कार्यालयात शनिवारी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. शेकाप आणि इतर पक्ष असा सामना नेहमी अलिबाग मध्ये होत असतो. परंतु आपला कायम विजय होत आला आहे. मात्र विधानसभा निवडणूक किती आपला अनपेक्षित पराभव झाला. आणि तो कार्यकर्त्यांच्या निश्चित जिव्हारी लागलेला आहे. इतर पक्षांना दोष देण्यापेक्षा पराभव का झाला याचा अभ्यास करणे आवश्यक असल्याचे पंडित शेठ पाटील म्हणाले. आम्ही प्रभाकर पाटलांची मुल आहोत घाबरणार मुळीच नाही , असेही ते म्हणाले. महिला व तरुणांनी गेल्या दोन महिन्यापासून मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले. त्यांनी मतदार संघ पिंजून काढला. त्या सर्वांचे मी आभार मानतो. आपण सर्वांनी खचून न जाता पुन्हा कामाला लागू असेही माजी आमदार पंडित पाटील यांनी सांगितले.