पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी निलेश सोनावणे 

 वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न 

पनवेल/प्रतिनिधी  पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा  नुकतीच पार पडली. मावळते अध्यक्ष दीपक महाडिक यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला .यावेळी उपस्थित सभासदांनी एकमताने पञकार  निलेश सोनावणे यांची सन 2019 – 2020 या वर्षासाठी अध्यक्षपदासाठी निवड केली. 

यावेळी जेष्ठ पत्रकार माधव पाटील, सुनील पोतदार, अरविंद पोतदार, सुनील कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी निलेश सोनवणे, कार्याध्यक्ष संजय कदम, उपाध्यक्ष रत्नाकर पाटील, सरचिटणीस मंदार दोंदे, सहचिटणीस विशाल सावंत, खजिनदार केवल महाडिक, सह खजिनदार सुधीर पाटील, प्रसिद्धी प्रमुख राज भंडारी तसेच साहिल रेळेकर, सल्लागार जेष्ठ पत्रकार माधव पाटील, सुनील पोतदार, दीपक महाडिक, सय्यद अकबर यांच्यासह कार्यकारिणी सदस्य अरविंद पोतदार, विवेक पाटील, अनिल भोळे, सुभाष वाघपंजे, मयूर तांबडे, गणपत वारगडा, सुबोध म्हात्रे, सुनील कटेकर, असीम शेख, शशिकांत कुंभार, दीपक घोसाळकर यांची या कार्यकारणीमध्ये निवड करण्यात आली .याबाबत पुढील कार्यक्रमांची रूपरेषा ठरविण्यात येणार असल्याबाबत सांगण्यात आले.  यावेळी पत्रकार अनिल कुरघोडे, बाळू जुमलेदार, राजेश डांगळे, कुणाल लोंढे, चंद्रशेखर भोपी, वचन गायकवाड, रवींद्र गायकवाड आदींसह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

           यावेळी पनवेलमध्ये पत्रकार एकजूट आणि ठराविक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी पत्रकारांसाठी हक्काच्या बाबी मिळविण्यासाठी एकत्र लढा देण्याच्या विषयामध्ये चर्चा करण्यात आली.