पनवेल तहसील कारकून अँटी करप्शनच्या जाळ्यात

 

 

 

साडेचार हजारांची लाच घेताना अटक
पनवेल प्रतिनिधी: – पनवेल तहसील कार्यालयात कारकून पदावर काम करणाऱ्याला साडेचार हजारांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक पथकाकडून शनिवारी सायंकाळी रंगेहात पकडण्यात आले. रायगड कार्यालयाकडून ही कारवाई करण्यात आली
 राखमाजी शेषराव चवणे, वय:- 45 कनिष्ठ लिपिक असे त्याचे नाव आहे.

लोकसभा  निवडणुकीत वाहन वापरले म्हणून मंजुर  भाडे आदा करण्यासाठी लाचेची मागणी केली होती. त्यानुसार संबंधिताने रायगड लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाच्या कार्यालयाकडे तक्रार केली होती. उप अधीक्षक अधिकराव पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले नेतृत्वाखाली
बळीराम पाटील, विश्वास गंभीर, निशांत माळी, घरत यांनी 
शनिवारी पनवेल तहसील कार्यालयात सापळा रचण्यात आला. आणि त्यामध्ये पैसे घेताना हा कारकून रंगेहात पकडला गेला. त्यामुळे पनवेल तहसील कार्यालयात सुरू असलेला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे.