आ. निलेश लंकेंच्या डोळयावर अण्णांनी लावला ‘नेत्र’दीपक चष्मा

 

 

जगविख्यात नेत्ररोग तज्ञ डॉ. तात्याराव लहाने साक्षीला
मातोश्री स्वर्गीय,लक्ष्मीबाई हजारे यांच्या पुण्यस्मरणाचे औचित्य

पारनेर /प्रतिनिधी: पारनेर नगर मध्ये जनतेने सर्वसामान्य कुटुंबातील आमदार निवडून लोकशाहीचा खऱ्या अर्थाने उद्धार केला आहे. त्यातच ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांचेही आशीर्वाद मिळाल्याने आमदार निलेश लंके यांनी जनकल्याणाच्या निर्धार केला आहे. मंगळवारी राळेगण सिद्धी येथे संपन्न झालेल्या नेत्र चिकित्सा शिबीर दस्तुरखुद्द अण्णांनी आ. लंके यांच्या डोळ्या

वर चष्मा लावून यातून लोकहित पहा असा जणू काय आशीर्वाद रुपी सल्ला दिला. या क्षणाचे जगविख्यात नेत्ररोग तज्ञ डॉ. तात्याराव लहाने सुद्धा साक्षीदार होते.
निमित्त होते, मातोश्री स्वर्गीय,लक्ष्मीबाई हजारे यांचे पुण्यस्मरण
पारनेर नगर विधानसभा मतदारसंघ आमदार निलेश लंके यांच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील युवकाने इतिहास घडवला. बारा महिने चोवीस तास जनतेत असणाऱ्या या शिक्षकाच्या मुलाला येथील जनतेला लोकवर्गणी करून विधानसभेत पाठवले. अर्थात त्यांच्या पाठीमागे जनचळवळ उभी राहिली. तू जर या भागात पाणी व इतर प्रश्नकरीता लढत असेल तर माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहतील. असे पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांनी सांगितले होते. दरम्यान विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काही तासातच आ. लंके यांनी हजारे यांचे आशीर्वाद घेतले. त्याचबरोबर दोन दिवसांनी राळेगणसिद्धी येथे येऊन जलसंधारणाची माहिती घेतली. सुरुवातीला 10 गावांमध्ये प्रायोगिक तत्वावर पाणी आडवा पाणी जिरवा मोहीम सुरू करण्याचा संकल्प आ. निलेश लंके यांनी अण्णासाहेब हजारे यांचा समक्ष केला. मंगळवारी हजारे यांच्या मातोश्री स्वर्गीय,लक्ष्मीबाई हजारे यांच्या पुण्यस्मरणा निमित्ताने राळेगण सिद्धी येथे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .
या शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ समाज सेवक अण्णा साहेब हजारे. डॉ तात्याराव लहाने व आ निलेश लंके यांच्या हस्ते झाले. यावेळी दादासाहेब पठारे,सरपंच जयसिंग मापारी,दत्ताभाऊ आवारी, उपचारासाठी तालुक्यातुन आलेल्या अनेक रुग्ण,वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच राळेगण-सिद्धी परिवार यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटन झाल्यानंतर याठिकाणी ठेवण्यात आल्या चष्मा तील एकच चष्मा अण्णासाहेब हजारे यांनी. आ निलेश डोळयाला लावला. हा क्षण उपस्थितांच्या चेहऱ्यावर हसू आणि आनंद फुलवणारा होता. हा जनसेवेचा चष्मा आहे, यातून लोकहित पहा आणि नेत्रदिपक कामगिरी करा असा मनोमन सल्ला अण्णांनी नवनिर्वाचित आमदारांना दिला तर नसेल ना ? असा प्रश्न उपस्थितांना पडला असावा.

नेत्र रूपी उरावे
परमेश्वराने मनुष्याला दिलेला सुंदर दागिना म्हणजे त्यांचे नेत्र त्याची किंमत दृष्टिहीन झालेल्यांना माहीत नसते.सुंदर सृष्टी पाहायची असेल तर सुंदर दुष्टीची आवश्यकता असते त्यामुळे प्रत्येकाने आपल्या मृत्यूनंतर मी नेत्रदान करनार असा संकल्प करणे गरजेचे आहे.असे आमदार निलेश लंके यांनी सांगितले.