कामोठे महोत्सवात रोवला शिवकालीन इतिहासात झेंडा

 


नितीन बानगुडे -पाटील यांनी उपस्थिंतांना  जिंकले
पनवेल/कै.बळीराम राघो पावणेकर सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय, झेंडा सामाजिक संस्था यांच्या वतीनेआगरी-कराडी “कामोठे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी नितीन बानगुडे पाटील यांनी आपल्या व्याख्यानातून शिवकालीन इतिहासाचा एक प्रकारे झेंडा रोवला. त्यांच्या वाणीने उपस्थितांना जिंकून घेतले.
जय पावणेकर व अशोक पावणेकर गेली एक दशक भर हा आगळा वेगळा महोत्सव आयोजित करून कामोठे करांना एक वेगळी मेजवानी देत आहेत. मंगळवारचा दिवस खऱ्या अर्थाने गाजला तो नितीन बानगुडे पाटील यांच्या व्याख्यानाने त्यांनी दोन तासात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहास उलगडला. शौर्य, धाडस, चिकाटी, जिद्द, गड , किल्ले , लढाई यासारख्या अनेक गोष्टी उपस्थितांना व्याख्यानाच्या माध्यमातून अनुभवायला मिळाल्या. बानगुडे पाटलांचा प्रत्येक शब्द शिवकालीन शौर्याची साक्ष देत होता. अंगावर शहारे येत होते, अनेकदा उपस्थितांचेे काळजाचे ठोके चुकत होते. तर शिव व्याख्यानातील काही प्रसंग आपल्या शब्दात नितीन बानगुडे पाटील सांगत असताना अनेकांची उर अभिमानाने भरून येत होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सूरदास गोवारी, जिल्हा सरचिटणीस भाऊ पावडे, राष्ट्रवादीचे कामोठे शहराध्यक्ष चंद्रकांत नवले यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोवारी आणि आयोजकांच्या हस्ते नितीन बानगुडे पाटील यांचे स्वागत करण्यात आले.
तत्पूर्वी मंगळागौरी -फेर -पारंपरिक बाज -स्त्री भ्रुण
हत्या विषयी जनजागृती करणारे नाटिका सादर करण्यात आली