उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री

 

 


महाराष्ट्र महाविकास आघाडीचा निर्णय
मुंबई प्रतिनिधी: – देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्र महाविकास आघाडी स्थापन झाली. यामध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील. याबाबत ठराव पारित करण्यात आला. असा ठराव  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मांडला. या ठरावाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात अनुमोदन दिले.