सुरदास गोवारींकडून आ. निलेश लंके यांचे अभिनंदन

 

 

यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये घेतली भेट

मुंबई/प्रतिनिधी- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुरदास गोवारी यांनी पारनेर -नगरचे आमदार निलेश लंके यांना विधीमंडळाच्या सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर अभिनंदन केले. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये या दोन नेत्यांची भेट झाली.उभयतांनी परस्परांच्या  खांदयावर हात टाकीत  मैत्रीत्वाचा धागा अधिक घट्ट केला.

कामोठे वसाहतीत पारनेर-नगरची मुळ रहिवाशी मोठया संख्येने राहतात. त्यामुळे आमदार निलेश लंके यांची येथे सातत्याने उठ बस असते. सुरदास गोवारी हे पनवेल येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे वजनदार नेते आहेत. दोघांमध्ये मैत्रीत्वाचे संबध आहेत. गोवारी यांनी पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात जावून लंके यांचा प्रचार केला होता. बुधवारी नवनिर्वाचीत आमदारांचा शपथ विधी संपन्न झाला. त्यामध्ये ‘रामकृष्ण हरी’ म्हणत सर्वाचे लक्ष वेधणाऱ्या आ. लंके यांनी विधीमंडळ सदस्यत्वची शपथ घेतली. त्याबद्दल  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश   चिटणीस सूरदास गोवारी व कामोठे शहराध्यक्ष चंद्रकांत नवले व पदाधिकाऱ्यांनी मुंबईत जावून अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.