नगरसेवक प्रकाश बिनेदार यांना मातृशोक

 

 


पोदी स्मशान भूमीत अंत्यसंस्कार होणार
पनवेल/ प्रतिनिधी पनवेल महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश बिनेदार यांच्या मातोश्री हिराबाई चंदर बिनेदार यांचे शनिवारी पहाटे दुःखद निधन झाले. मृत्युसमयी त्या 80 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पाठीमागे तीन मुले, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. निधनाची वार्ता समजल्यानंतर पनवेल परिसरातील राजकीय-सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठ प्रतिष्ठित व्यक्तींनी शोक व्यक्त केला.
सकाळी 11.30 वाजता नवीन पनवेल पेट्रोल पंप च्या बाजूला असलेल्या गौरेश को.ऑ. सोसायटी येथून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. पोदी येथील स्मशानभूमी येथे मातोश्री हिराबाई चंदन बिनेदार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.